You are currently viewing शालेय थाय बॉक्सिंग व सिलंबम ( लाठी-काठी ) स्पर्धेचे आयोजन 28 जानेवारीला

शालेय थाय बॉक्सिंग व सिलंबम ( लाठी-काठी ) स्पर्धेचे आयोजन 28 जानेवारीला

देवगड :

क्रीडा व युवक सेवा संचालनाय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्गतर्फ जिल्हास्तरीय शालेय थाय बॉक्सिंग व सिलंबम स्पर्धेचे आयोजन 28 जानेवारी 2023 रोजी बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली येथे करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथमच शालेय थाय बॉक्सिंग व सिलंबम स्पर्धेचे आयोजन जिल्ह्यामध्ये होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जास्तीत जास्त खेळाडूंनी स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा थाय बॉक्सिंग व सिलंबम (लाठी-काठी ) असोसिएशनचे अध्यक्ष प्राध्या. विवेक राणे व सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी मा. विद्या शिरस मॅडम यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये सेल्फ डिफेन्स व मार्शल आर्ट्स चा प्रचार होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवण्यासाठी योग्य ते सहकार्य केले जाईल, तसेच जास्तीत जास्त खेळाडूंनी नोंदणी करून सहभागी व्हावे असे बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली व अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था मुंबई च्या सेक्रेटरी मा. सुलेखा राणे मॅडम यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × one =