You are currently viewing संक्रमण

संक्रमण

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…स्नेहल प्रकाशन परिवार समूह सदस्य लेखक कवी प्रो.डॉ.जी. आर. उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*संक्रमण*

ती तिळगुळ घेऊन आली
गोड बोलुनी गेली

नवं वर्षाचा नवं सण
आंनद घेऊनि आला
सृजनाच्या दिठीत
संक्रमण घेऊन आला
नवं ऋतूंची नवं पालवी
गुपित बोलून गेली

उत्तरायणातील रवी
प्रखर किरणांचा
थंडीतील गारवा
शिशिर सांगून आला
आम्रतरु वरील कोकिळा
कुजबुज करून गेली

मकर संक्रातीला
गोड गोड बोलूया
विसरून हेवे दावे
साथ संगत धरूया
असच काहीतरी
ती कानात सांगून गेली
ती तिळगूळ घेऊन आली
गोड बोलूनी गेली

प्रो डॉ जी आर प्रवीण
तिरूपती
14 जानेवारी 23

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × one =