You are currently viewing नेमळेत श्री देव मलेश्वर देवस्थानचा पूनःप्रतिष्ठापनेचा वर्धापनदिन सोहळा

नेमळेत श्री देव मलेश्वर देवस्थानचा पूनःप्रतिष्ठापनेचा वर्धापनदिन सोहळा

सावंतवाडी :

 

नेमळे येथील जागृत देवस्थान श्री देव मलेश्वर देवस्थानचा पूनःप्रतिष्ठापनेचा वर्धापनदिन सोहळा बुधवार दि.०१ फेब्रुवारी २०२३ ते शुक्रवार- दि.०३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत संपन्न होत आहे यानिमित्ताने श्री देव मलेश्वर मंदिरामध्ये ‘रुद्र स्वाहाकार सोहळा’ संपन्न होणार आहे. तरी या सोहळ्यास सर्व देणगीदार, भाविक -भक्त, पाहुणे, शिमधडे वगैरे मंडळीनी बहुसंख्येने उपस्थित राहून या सोहळ्याच्या कृपाप्रसादाचा, महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती नेमळे गावातील गांवकर मानकरी तसेच ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. यानिमित्त होणारे कार्यक्रम खालील प्रमाणे –

बुधवार दि.१ फेब्रुवारी २०२३ सकाळी ७.०० ते ९.०० – शांतीपाठ, देवतांची प्रार्थना, पुण्याहवाहन, संभारदान. सकाळी ९.०० ते दु. १.०० -सिध्दिविनायक महागणपती पूजन प्रकारशुध्दी देवता स्थापना, रुद्राभिषेक, जयाभिषेक, गुरुवार दि.०२ फेब्रुवारी २०२३ सकाळी ७.०० वाजल्यापासून अग्नीस्थापन, होमहवन, सकाळी ११.००वा पूर्णाहूती दुपारी १२.३० वा.महानैवेद्य, आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद. शुक्रवार- दि ३ फेब्रुवारी २०२३ सकाळी ११.०० वा श्री देवी सातेरी मंदिरामध्ये लघुरुद्र व ब्राह्मण समराधना रात्रौ ठिक १० वा जय हनुमान दशावतारी नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + four =