You are currently viewing मराठी साहित्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वाङमयीन योगदान

मराठी साहित्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वाङमयीन योगदान

२३ रोजी पंचम खेमराज महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन

सावंतवाडी

श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या व भाषा संचनालयाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरावड्या निमित्त 36 जिल्हे 36 व्याख्याने या उपक्रमाअंतर्गत सोमवार दि.23 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजता मराठी साहित्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वाङमयीन योगदान या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर व्याख्यानासाठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक मा. प्रा. प्रवीण दशरथ बांदेकर यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखम सावंत भोंसले भूषविणार आहेत या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल,मराठी विभाग प्रमुख प्रा.माणिक बर्गे उपस्थीत राहणार आहेत.त्याचबरोबर भाषा संचालनालयाचे सहाय्यक संचालक मा.शरद यादव पर्यवेक्षक मा.संदीप साबळे मा.अजित पवार ,मा.अभय राजे कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत . या व्याख्यानाच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक श्री प्रवीण दशरथ बांदेकर यांचे विचार ऐकण्याची संधी प्राप्त होणार आहे. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा