You are currently viewing पाच पायांच्या बैलाची कारीवडे गावात प्रवेश

पाच पायांच्या बैलाची कारीवडे गावात प्रवेश

मंगेश तळवणेकर रवी परब यांनी चारा, पाण्याची केली व्यवस्था; बैल कोणाचा असल्यास संपर्क साधण्याचे केले आवाहन

सावंतवाडी

ओटवणे येथे गेले आठ दिवस वास्तव्यास असलेल्या पाच पायांच्या बहुचर्चित बैलाने गुरुवारी सकाळी कारीवडे गावात एन्ट्री करत सर्वांचेच लक्ष वेधले. यावेळी पाठीवर पाचवा पाय असलेल्या या बैलाच्या चारा व पाण्याची व्यवस्था सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर तसेच रवी परब व इतर ग्रामस्थांनी केली.

गेले आठ दिवस ओटवणेवासियांनीही या बैलाचा पाहुणचार केला होता. या बैलाच्या पाठीवर व्यंग असलेला पाचवा पाय असल्यामुळे तो चर्चेत होता. कारीवडे गावात या बैलाने प्रवेश केल्याची माहिती मिळताच त्याला पाहण्यासाठी गर्दी झाली. सध्या या बैलाला संजय जाधव यांच्या घरी बांधून ठेवण्यात आलेला आहे. त्याच्या चारा पाण्याचीही सोय करण्यात आली आहे. हा बैल कोणाचा असेल तर त्यांनी 8668780645 व 9421269444 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − nine =