You are currently viewing चौके येथील भराडी मंदिराच्या दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला

चौके येथील भराडी मंदिराच्या दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला

दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद 

मालवण

मालवण – कसाल रस्त्यावर चौके येथील ग्रामदेवता श्री देवी भराडी मंदिरातील दानपेटी शनिवारी रात्री दोन अज्ञात चोरट्यानी फोडून आतील रोख रक्कम लंपास केली आहे. मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये दोन चोरटे दिसून आले असून या घटनेची माहिती मालवण पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी गणेश विसर्जन असल्याने मंदिरात कोणी नसल्याने रात्री ८.३० वाजण्याच्या दरम्यान दोन चोरटे मंदिराच्या उजवीकडील मागील दरवाजाने मंदिरात प्रवेश करत आतमध्ये आले. दोन्ही चोरट्यानी रेनकोट व चेहरा पूर्णपणे रुमालाने बांधून कटावणीच्या सहाय्याने दानपेटीची असलेली तीनही कुलुपे फोडून चतुर्थी सणात चाकरमानी तसेच भक्त मंडळीनी देवीला दिलेले हजारो रुपये दानावर डल्ला मारला. शनिवारी रात्री मुसळधार पाऊस असल्याने मंदिरात रात्री कोणी आले नव्हते. रविवारी सकाळी सदर घटना निदर्शनास आली. संबंधित गावकर मंडळींनी याबाबत मालवण पोलिसांना माहिती दिली. मालवण पोलीसानी सदर चोरीची तसेच मंदिरात बसवलेल्या सीसीटिव्ही फूटेजची पहाणी केली. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 15 =