You are currently viewing नशाबंदी मंडळाच्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत संदीप कदम प्रथम

नशाबंदी मंडळाच्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत संदीप कदम प्रथम

रसिका आयरे द्वितीय तर वैष्णवी सुतार तृतीय

कणकवली

नशाबंदी मंडळ महाराष्ट्र्र राज्य यांच्या वतीने कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रमात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय व्यसनमुक्तीपर काव्य सादरीकरण स्पर्धेत संदीप हरी कदम यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर रसिका संतोष आयरे आणि वैष्णवी गोपाळ सुतार यांनी अनुक्रमे दितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला.

नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने कणकवली गोपुरी आश्रम सभागृह येथे ‘व्यसनमुक्ती संमेलन’ पार पडले. यावेळी नशाबंदी मंडळाची भूमिका याविषयी मान्यवरांनी चर्चा केली. तसेच यानिमित्ताने व्यसनमुक्ती परिसंवाद आणि व्यसनमुक्ती काव्य स्पर्धा आणि कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. काव्य स्पर्धेत एकूण ३२ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेत संदीप हरी कदम यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. रसिका संतोष आयरे यांनी द्वितीय तर वैष्णवी गोपाळ सुतार यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. यावेळी वाढत जाणाऱ्या व्यसनाधीनतेवर प्रत्येक कवींनी आपल्या कवितेतून फटकारे मारले. जनजागृती करण्याचे माध्यम म्हणून व्यसनमुक्तीचे काव्य प्रभावी भूमिका निभावेल. व्यसनाधीनतेच्या लढ्यात युवकांची भूमिका महत्त्वाची असून काव्य स्पर्धेतील तरुण वर्गाचा सहभाग आदर्श आहे. सर्वांनी मिळून या व्यसनाधीनतेच्या संकटाचा सामना करायला हवा, असे मत असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. मनिषा पाटील, प्रा. संजीवनी पाटील आणि रिमा भोसले यांनी काम पहिले.

यावेळी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबईचे सरचिटणीस वर्षा विद्या विलास, राज्य संघटक अमोल मडामे, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, प्रा. सुभाष सावंत, पत्रकार महेश सरनाईक, प्रा. सुरेश पाटील, नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × two =