You are currently viewing वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या शिक्षण संकुलाचा विस्तार

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या शिक्षण संकुलाचा विस्तार

*वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या शिक्षण संकुलाचा विस्तार;*
*२७ जानेवारीला नव्या वास्तूचे होणार शानदार भूमिपूजन*
*नवी शैक्षणिक दालने ज्ञानदानासाठी उपलब्ध करणार : अॅड. आप्पासाहेब देसाई*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

गेल्या अनेक दशकांहून शिक्षणदानाचे अविरत आणि सामाजिक बांधिलकीचे कार्य करणाऱ्या वसंतदादा पाटील प्रतिष्ठानने आपल्या शैक्षणिक सेवांचा विस्तार करण्यासाठी तसेच अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानदानाचे कार्य पोहचावे, यासाठी नव्या वास्तूची निर्मिती करण्याचे ठरवले आहे. त्याचे भूमिपूजन येत्या २७ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी नऊ वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर, निवृत्त सनदी अधिकारी डॉ. ए. टी. कुंभार, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर तसेच संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार काटकर, सेक्रेटरी अॅड. आप्पासाहेब देसाई आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

 


हे नवे शैक्षणिक संकुल २ लाख चौरस फूट जागेवर उभे राहणार असून त्यात सहा मजले असतील. इंटरनॅशनल स्कूल, इंटरनॅशनल लेव्हल रिसर्च सेंटर, फॉर्मसी, आर्किटेक्ट, विधी या विषयावरील महाविद्यालयांसाठी स्वतंत्रपणे जागा प्रत्येक मजल्यावर दिल्या जातील. त्याचबरोबर विद्यार्थी व शिक्षकांसाठी रिक्रिएशन एरियादेखील उपलब्ध करण्यात येणार आहे. सध्या २११ कर्मचारी व २१०८ इतकी विद्यार्थी संख्या असलेल्या संकुलात या नव्या संकुलाच्या निर्मितीमुळे मोठ्या प्रमाणावर वाढ होईल तसेच मुंबई, ठाणे, नवी मुंबई अशा सर्वांसाठीच केंद्रस्थानी असलेल्या या संकुलामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांसाठी इथे शिक्षण घेणे अत्यंत सोयीचे ठरेल, असा विश्वास अॅड. आप्पासाहेब देसाई यांनी व्यक्त केला आहे.
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचा हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असून गेली अनेक वर्षे त्याच्या निर्मितीसाठी नियोजन व कार्य करण्यात येत आहे. सर्व शासकीय परवानग्या तसेच अन्य सोपस्कार पूर्ण करण्यात आले असून लवकरच ही वास्तू विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी व्यवस्थापकीय मंडळी परिश्रम घेत आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन केंद्र हे शैक्षणिक क्षेत्रात लौकिकप्राप्त असेल तसेच आंतरराष्ट्रीय शाळादेखील काळाची गरज ध्यानात घेऊन सुरु करण्यात आली आहे. फार्मसी हे महाविद्यालय नव्याने सुरु होत आहे तर आर्किटेक्ट आणि विधि महाविद्यालय सध्या कार्यरत असून त्याचा विस्तार या प्रकल्पामुळे होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × one =