You are currently viewing विधी सेवा प्राधिकरण कडून तालुक्यात कायदेविषयक जनजागृती

विधी सेवा प्राधिकरण कडून तालुक्यात कायदेविषयक जनजागृती

सावंतवाडी

सावंतवाडी विधी सेवा प्राधिकरण कडून तालुक्यात कायदेविषयक जनजागृती करण्यात आली. लोकांमध्ये कायदेविषयक जनजागृती व माहिती मिळावी यासाठी विधी सेवा प्राधिकरणकडून तालुक्यातील निरवडे, तळवडे, मळगाव सोनुर्ली , डोंगरपाल, कास, शेर्ले, निगुडे, वेत्ये, बांदा, नेमळे, डेगवे, विलवडे, वाफोली, इन्सुली, माजगाव या गावोत जाऊन जनजागृती व माहिती उपक्रम राबविण्यात आला.

गावोगावी ग्रामस्थांना कायदेविषयक माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले.तसेच उपस्थित ग्रामस्थांना विधि सेवा प्राधिकरणची कार्ये, प्राधिकरण करून कोणत्या व्यक्तींना मोफत विधी सेवा पुरविली जाते,विधी सहाय्य प्राप्त करण्यासाठी कशाप्रकारे अर्ज करावा या सर्व सेवांची माहिती बेलीफ प्रसाद मराठे यांनी दिली.विधी स्वयंसेवक निर्जरा परब,प्रसाद मराठे, रमेश परववार यांनी ग्रामस्थांना व व्यापाऱ्यांना माहिती दिली.यावेळी दुकानदार, रिक्षा व्यावसायिक,महिला यांना कायदेविषयक माहिती पत्रक देण्यात आले.सदरचा उपक्रम हा सावंतवाडी दिवाणी न्यायाधीश आर आर बेडगकर यांच्या मार्गदर्शाखाली घेण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा