“ओढ आभाळाची”

“ओढ आभाळाची”

“ओढ आभाळाची”

आभाळ फाटत असताना
समजत नाही,,,
ठिगळ कुठे लावायचं?
फाटलेल्या आभाळाला कसं
भावनेच्या धाग्यांनी शिवायचं?

ओढ होती आभाळाची,
हवेत हात उंचावूनी,
क्षणार्धात झेपावायचं…
काळ्या ढगांनी आच्छादल्यावर
कसं आभाळ मज दिसायचं?

ओथंबूनी येताच ढग,
आभाळ टेकडीवर भासायचं,
मनात तेव्हाच प्रश्न पडायचा,
आभाळाला कधी अलगद…
हात टेकवून यायचं?

मळभ दूर झाल्यावर,
आभाळ निरभ्र असायचं..
पाण्यातही प्रतिबिंब त्याचं,
अगदी हुबेहूब दिसायचं,
आभाळ आणि धरणीचं,
कदाचित…
असंच मिलन होतं असायचं…

(दिपी)✒
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा