You are currently viewing सेन्सेक्समध्ये २३६ अंकांनी घट

सेन्सेक्समध्ये २३६ अंकांनी घट

*सेन्सेक्समध्ये २३६ अंकांनी घट*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

अमेरिकन बाजारातील कमजोर पार्श्वभूमीवर शुक्रवारी शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घट झाली आहे.

सेन्सेक्स २३६.६६ अंकांनी किंवा ०.३९ टक्क्यानी घसरून ६०,६२१.७७ वर बंद झाला. दिवसभरात तो २७३.१८ अंकांनी किंवा ०.४४ टक्क्यानी घसरून ६०,५८५.२५वर बंद झाला. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ८०.२० अंकांनी किंवा ०.४४ टक्क्यानी घसरून १८,०२७.६५ वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, नेस्ले, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो, मारुती, इन्फोसिस आणि भारती एअरटेल यांच्या समभागात घसरण झाली. तर पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयटीसी, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या कंपन्यांच्या समभागात वाढ झाली. आशियाई बाजारात सेऊल, टोकियो, शांघाय आणि हाँगकाँगमधील बाजारात वाढ झाली तर युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत सकारात्मक व्यवहार चालू होते.

आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.८२ टक्क्यानी वाढून ८६.८७ अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरल झाले. तर विदेशी संस्थागत गुंतवणूकदार (एफआयआय) यांनी गुरुवारी भांडवली बाजारात ३९९.९८ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले, असे शेअर बाजाराने सांगितले. सुमारे १५३३ शेअर्स वाढले आहेत, १८६५ शेअर्समध्ये घट झाली आहे आणि १४६ शेअर्स अपरिवर्तित आहेत.

मेटल, फार्मा आणि एफएमसीजी निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्यांनी घसरले.

बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी घसरले.

भारतीय रुपया ८१.३५ च्या आधीच्या बंदच्या तुलनेत प्रति डॉलर ८१.१२ वर बंद झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 17 =