You are currently viewing निसर्ग साक्षी

निसर्ग साक्षी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री मृणाल प्रभुणे लिखित अप्रतिम कविता*

*निसर्ग साक्षी*

माडा- पोफळीच्या बागेत
गंधीत वारा होता

सुखसंवाद ऐकणारा
सागर किनारा होता

जाता जाता खेळवणारा
हसरा पाऊसही होता

लाटालाटांवर दिसणारे नाव
तुझेच तर होते..

किना-यावरील ओल्या रेतीत
होत्या तुझ्याच पाऊलखुणा

अशा निसर्ग साक्षीने
सहवास आपुला फुलत होता..

नंतर मात्र तू सगळंच
विसरत गेलास…

तुझ्या आयुष्यात तू
रमतच गेलास

व्यवहारी जगात
हरवून गेलास.. आणि
मलाही विसरून गेलास

आजही तुझ्या आठवणीने
डोळ्यांना येतो पूर

पापणीतल्या धुक्यामुळे
झाल्या धुसर पाऊलखुणा

मनातल्या पावसाने
आता क्षितीजही ओलावते

ऊर भरल्या तांडवात
लाटांवरले नावही हेलकावते

किनाराही आता असतो
मनापासून दूर दूर

आजही तोच निसर्ग
आहे साक्षीस

पण तूच तोच आज
नाही साथीस..
🍂

मृणाल प्रभुणे
नाशिक.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 5 =