You are currently viewing जिल्हास्तरीय पत्रकार क्रिकेट स्पर्धेचे संजू परबांच्या हस्ते उद्घाटन…

जिल्हास्तरीय पत्रकार क्रिकेट स्पर्धेचे संजू परबांच्या हस्ते उद्घाटन…

सावंतवाडी

इडमिशन संस्था आणि सावंतवाडी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे प्रवक्ते संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार आणि राजकारणी यांच्यातील संबंध गेली अनेक वर्षे चांगले असल्यामुळे मला त्याचा फायदा सामाजिक जीवनात झाला. यापुढेही पत्रकारांनी मला सहकार्य करावे, असे आवाहन श्री. परब यांनी केले. येथील जिमखाना मैदानावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी श्री. परब बोलत होते.
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, रमेश बोंद्रे, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, ऍडमिशन संस्थेचे व्यवस्थापक संदीप नाटलेकर, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार संतोष सावंत, राष्ट्रीय पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गजानन नाईक,ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे,हरिश्चंद्र पवार, विजय देसाई, संतोष परब, उमेश सावंत, मोहन जाधव, हेमंत मराठे, राजेश मोंडकर, सचिन रेडकर, प्रसन्न गोंदावळे, विशाल पित्रे, नरेंद्र देशपांडे, शुभम धुरी, आनंद धोंड, शैलेश मयेकर, दीपक गांवकर, लुमा जाधव, स्वप्नील उपरकर, महेश चव्हाण, भूवन नाईक, राजू तावडे, मदन मसुरकर, मंगल कामत, रामचंद्र कुडाळकर, अनुजा कुडतरकर, निखील माळकर, अनिकेत गावडे, अनिल भिसे, जतिन भिसे, मयुर चराठकर, विनायक गांवस, नागेश पाटील, यशवंत मांजरेकर, सिद्धेश सावंत, राजाराम धुरी, प्रितम धुरी, काका भिसे, विजय राऊत, सचिन मांजरेकर, अवधूत पोईपकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 3 =