अविनाश पराडकर यांचे सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडून विशेष अभिनंदन….

अविनाश पराडकर यांचे सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडून विशेष अभिनंदन….

भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल विधानसभा सदस्य, माजी कॅबिनेट मंत्री सुधीरभाऊ मुनगुंटीवार यांनी खास पत्र पाठवून अभिनंदन केले आहे.

या पत्रात सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी म्हंटले आहे की आजच्या तंत्रस्नेही युगात सोशल मीडियाला असलेले विशेष महत्व लक्षात घेता आपणावर या पदाच्या माध्यमातुन मोठी जबाबदारी आली आहे. आपण कार्यक्षम पदाधिकारी आहात. या जबाबदारीचे निर्वाहन आपण समर्थपणे कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे. या पदाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची ध्येयधोरणे, मा.नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे लोकहितकारी निर्णय जनसामान्यांपर्यंत पोहोचवत पक्षाचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी आपण परिश्रम घ्याल व भाजपाची प्रतिमा अधिक ओजस्वी कराल याचा मला विश्वास आहे. आपल्या पदाच्या यशस्वीततेसाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा आहेत.

विशेष म्हणजे अविनाश पराडकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्त करण्यात आलेले एकमेव पदाधिकारी आहेत. त्यांच्या नियुक्तीबद्दल सिंधुदुर्गातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून समाधान व्यक्त करून सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा