You are currently viewing बहुचर्चीत देवगड निपाणी हैद्राबाद रस्यावरील ४० फुट रस्याचे भुमीपुजन संपन्न

बहुचर्चीत देवगड निपाणी हैद्राबाद रस्यावरील ४० फुट रस्याचे भुमीपुजन संपन्न

फोंडाघाट बाजार पेठ रुंदीकरणाचा शुभारंभ

फोंडाघाट

बहुचर्चीत देवगड निपाणी हैद्राबाद रस्यावरील ४० फुट रस्याचे भुमीपुजन आज बंडु पटेल, आबु पटेल,आप्पा पटेल १२/५ चे मानकरी यांच्या उपस्थितीत पार पडले. सर्व लोकांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.  सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी, सर्व ग्रामपंचायत सदस्य,  विश्वनाथ जाधव, सुनील लाड, राजन चिके, विश्वनाथ जाधव सर्व मान्यवर यावेळी  हजर होते. विकास कामात सर्वांनी सहकार्य करा असे आवाहन करण्यात आले.  माजी सरपंच संतोष आग्रे यांच्या आवानहाला सर्वांनी  पाठींबा दिला. श्रीफळ वाढवून श्री.बंडु पटेल यांनी कामाचा शुभारंभ केला.  सर्व सहकार्य करु असे अजित नाडकर्णी आणि सर्व लोकांनी यावेळी अभिवचन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + 6 =