You are currently viewing उद्योगपती चंद्रकांत सदडेकर यांचे मुंबईत निधन…

उद्योगपती चंद्रकांत सदडेकर यांचे मुंबईत निधन…

कणकवली

तालुक्‍यातील भिरवंडे गावचे सुपुत्र, मुंबईतील प्रतिथयश उद्योगपती चंद्रकांत नारायण सदडेकर (वय ७३) यांचे आज मंगळवारी मुंबईत दादर येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने भिरवंडे गावावर शोककळा पसरली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शून्यातून विश्व निर्माण करणार्‍या एका हरहुन्नरी, अभ्यासू आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्वाची अकाली एक्झिट सर्वांनाच चटका लावणारी आहे अशा शब्दांत त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि भिरवंडेवासीयांनी श्रध्दांजली वाहीली आहे.
भिरवंडे-जांभूळभाटलेवाडी येथील रहिवाशी असलेले चंद्रकांत सदडेकर यांनी गावी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण करून ते मुंबईत गेले. मुंबईत त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. मात्र नोकरीत त्यांचे मन रमले नाही त्यामुळे त्यांनी उद्योगक्षेत्राची कास धरली. आपल्या उपजत अभ्यासू आणि मेहनत या गुणांच्या जोरावर त्यांनी अल्पावधीत एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण केली. अनेक सामाजिक संस्थांमध्ये ते कार्यरत होते. कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळावर संचालक म्हणूनही त्यांनी काम केले होते. सदडेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक संस्थांना त्यांनी सढळ हस्ते मदत केली होती. सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठीही त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. गावातील सामाजिक, धार्मिक कार्यातही ते सहभागी होत असत. चंद्रकांत सदडेकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + 10 =