You are currently viewing बांदा केंद्र शाळेच्या दिव्यांग धीरजचा विज्ञान प्रदर्शनात विशेष सन्मान

बांदा केंद्र शाळेच्या दिव्यांग धीरजचा विज्ञान प्रदर्शनात विशेष सन्मान

बांदा

शिक्षण विभाग सावंतवाडी आयोजित 50 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बांदा नं. 1केंद्रशाळेत इयत्ता सातवीत शिकत असलेल्या विशेष गरजाधारक विद्यार्थी धीरज सतिश पटेल या विद्यार्थ्यांचा विज्ञान प्रदर्शनातील सहभागाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
धीरज हा कर्णबधिर विद्यार्थी असून त्याचा पालकांनी धीरजला इयत्ता पहिलीत जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं 1शाळेत दाखल केले.या शाळेतील शाळेतील शिक्षक व समुह साधन केंद्रातील विषय शिक्षकांच्या मदतीने सर्वसामान्य मुलांबरोबर शिक्षण घेत असून धीरजचा शाळेत विविध उपक्रमात उत्साहाने सहभागी होत असतो.
नुकत्याच शिक्षण विभाग सिंधुदुर्ग यांनी आयोजित केलेल्या सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात धीरज सतिश पटेल या विद्यार्थ्यांने गरम हिटर फॅन या प्रतिकृती ची मांडणी केली होती.
विशेष गरजाधारक असून धीरजने विज्ञान प्रदर्शनात केलेल्या सादरीकरणाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे
मी, सावंतवाडी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके,उपशिक्षणाधिकारी श्री शेर्लेकर , केंद्रप्रमुख संदीप गवस मिलाग्रीस स्कूल चे मुख्याध्यापक फादर सालदाणाआदि मान्यवरांच्या उपस्थितीत धीरजचे कौतुक करण्यात आले . यावेळी धीरजला मार्गदर्शन करणारे विषय शिक्षक शिवशंकर तेली ,वर्गशिक्षिका उर्मिला मोर्चे, उपशिक्षक श्री जे.डी.पाटील ,रंगनाथ‌ परब ,धीरजची आई अंजली पटेल उपस्थित होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + 16 =