You are currently viewing सत्कार्याचं बिजारोपंन..
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

सत्कार्याचं बिजारोपंन..

*वक्रतुंड साहित्य समूहाचे संस्थापक अध्यक्ष लेखक कवी श्री.जगन्नाथ खराटे लिखित अप्रतिम लेख*

*सत्कार्याचं बिजारोपंन…*

सकाळचा गजर वाजला अन् जाग आली, कारण सकाळी उठून कामाला लागायचे होते.मग दैनंदिन कामे सुरू झाली.. अन् क्षणभर विचार केला की, जर जागी झालोंच नाही तर काही कामे होणारच नाही..पन् असं कधी होवुंच शकत नाही, आपन जरी झोपी गेलो तरी आपल्या शरिरातील,अन्नपचन, श्वासोच्छ्वास, जांभई, अन् मनातल्या विचारांचे कार्य सुरू असुन आपन एका वेगळ्या अशा स्वप्नांच्या जगांत‌ वावरंत असतो… त्यामुळे कार्य हे जिवनाचा आविर्भाज्य अंग आहे हे अगदी त्रिवार सत्य आहे..
आपलं जिवन किंवा आयुष्य जगनं म्हणजे हे भलंमोठं कार्य आहे असं मला वाटतं.अन हे सर्वांना अगदी शंभर टक्के पटतं..खरं तर जन्माला येणारा हा प्रत्येक जिव हृया स्रृष्टित कार्य करायलाच येतो असं मला अगदी खात्रीनं वाटतं, अन् कार्य करण्यासाठी एक शक्ती सोबत घेवून येतो.. त्यालाच जीव किंवा प्राण म्हटलं जातं..त्यांचं कारणं हे कि निसर्गातील कोणतीही जड वस्तू ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जी काही शक्ती लागते तींच जर नसेल तर ती वस्तू हलनार नाही अन् कार्य किंवा कृती घडणार नाही.अन अशी अकार्यक्षम वस्तू ही कुठलेही कार्य करु शकनार नाही… खरंतर संपूर्ण स्रुष्टित अगदी सुक्ष्म रुपांत किंवा अनुरूपांत एक दिव्य शक्ती आहे अन् त्या द्वारे स्रुष्टिचं अविरत सुरू आहे….
कार्य म्हणजे कृती, किंबहुना कर्म.. कार्य हे करण्याशिवाय घडंत नाही, मग ते कुठल्याही प्रकारचे असो‌..खरं तर, कार्य घडण्यासाठी कारण लागते, उदा,भुक लागली की ती भागवण्या साठी अन्न शोधन्यासाठी जिवाला हालचाल रुपातुन अन्न शोधकार्य करावं लागतं.अशा प्रकारे कार्याशिवाय सृष्टीत काहींच घडु शकत नाही…

कोणतंही कार्य हे चांगलं किंवा वाईट ह्या विभागात गणल्या जाते. चांगलं कार्य हे आनंद देते तर वाईट काम हे दुःख देते.. अन् ह्याशिवाय आणखी तिसरं कार्य हे आनंद आणि दुःखाच्या पलीकडचं असतं.त्यालांच नैसर्गिक कार्य म्हटले जाते.. अगदी पुर्वी सांगितल्याप्रमाणे श्वासोच्छ्वास, अन्नपचन, इत्यादी..
भगवत्गितेत ह्या कर्माचं रुप विस्तार करुन सांगीतलं आहे.
सत्व(चांगलं) राजस(चांगलं+वाईट)
तामस(वाईट)हे प्रकार सांगितले आहेत. ह्या तिन्ही प्रकारच्या कार्याचे स्वरूप नित्य, अन् नैमित्तिक असे असते.. नित्य म्हणजे नेहमी, अन् नैमित्तिक म्हणजे कधीतरी.. किंवा निमित्ताने.,( प्रसंगानुरूप)..
आपल्या आयुष्यात काही कार्य हे नित्यनेमाने करावी लागतात. तर काही नैमित्तिक म्हणजे प्रसंगानुरूप करावी लागतात..

भगवत्गितेत,साधारणपने सत्कार्य करण्याचा उपदेश केला आहे त्यामुळे आपं‌लं कर्म हे ऊर्ध्वगामी होवुन मोक्ष म्हणजे मुळ रुपातील ईश्वरासन्निध जावु शकतो.किंबहुना आपल्या मुळ ठिकाणी सुखरूप पोहचण्यासाठी ते उपयुक्त ठरते.. ह्या उलट दुष्कर्म करुन आपन अधःपतन होवुन दुष्कर्माची फळे भोगण्यासाठी धरतीवर खालच्या योनीत( जड जिवजंतु, पशुपक्षी , किंबहुना मानवेतर प्राणी,)जन्माला यावे लागते..
मग सहजंच प्रश्न पडतो की सत्कार्य काय?.अन् दुष्कार्य काय??
खरं तर अगदी सोपं ऊत्तर आहे ह्याचं..
तुकाराम महाराजानी सांगीतल्याप्रमाणे “”पुण्य परोपकार, पाप परपीडा””
सत्कार्य हे पुण्यकर्म असल्याने सत्कार्य म्हणजे परोपकार करणे हे चांगलं काम आहे ..
तर दुसर्याना दुःख देते हे दुष्कार्य किंवा पापमय़ किंवा वाईट असल्याने त्याचं‌ फळ म्हणजे जिवाला अधःपतित होवून भोगावं लागतं..

भगवत्गितेच्या उपदेशानुसार आपन जगतो काय? हा मोठं प्रश्न आहे.अन आपन आपल्या आयुष्यात तसं वागत नसल्याने आपल्याला जगात सर्वत्र त्यामुळे दुःख दिसुन येते.अन ते बरोबर आहे.. कारण आपण जसं बी पेरु तसंच ते फळ देइल जर दुष्कार्याचं बीज पेरलं तर सर्वत्र दुःख अन् समस्या सकंटांच साम्राज्य पसरेल..अन जर सत्कार्याचं बीज पेरले तर सर्वत्र आनंदाचे नंदनवन फुलेल..

©️जगन्नाथ खराटे-ठाणे..
२९डिसें २०२२

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + 7 =