You are currently viewing अपघात टाळण्यासाठी एकेरी मार्गावर ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नये – जितेंद्र पाटील

अपघात टाळण्यासाठी एकेरी मार्गावर ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नये – जितेंद्र पाटील

अपघात टाळण्यासाठी चालकांनी नियमाचे पालन करावे..

बांदा

अपघात टाळण्यासाठी कधीही एकेरी मार्गावर ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या एका चुकीमुळे आपले व समोरच्याचे आयुष्य उध्वस्त करू नका. यासाठी आरटीओ ने दिलेल्या मार्गदर्शक नियमांचे पालन करून वाहन चालवील्यास अपघात टाळता येतील, यासाठी सर्व चालकांनी पुढाकार घेऊन नियमावलींचे पालन करावे असे आवाहन मोटार वाहन निरीक्षक जितेंद्र पाटील यांनी कळणे येथे केले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयच्या वतीने कळणे मायनिंग येथे रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री पाटील बोलत होते. यावेळी पोलीस वाहतूक शाखेचे प्रदीप पुजारी, भूषण नाईक, अनिल मोटार ड्रायव्हिंग स्कुलचे संचालक अनिल पावसकर, कळणे मायनिंगचे व्यवस्थापक अमित कायसुयकर, सरव्यवस्थापक शेखर गावकर, व्यवस्थापक किरण गाड, पियुसी केंद्राचे योगेश केसरकर, दशरथ कदम, दिपेंद्र कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी निरीक्षक पाटील यांनी वाहतुकीच्या नियमांची उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. यावेळी वाहनांना रेडीयम व रिफ्लेक्टर लावण्यात आले. आभार अनिल पावसकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 11 =