You are currently viewing भाजपा च्या पाठपुराव्यामुळे परबवाडा ग्रामपंचायत मध्ये तलाठी नियुक्त

भाजपा च्या पाठपुराव्यामुळे परबवाडा ग्रामपंचायत मध्ये तलाठी नियुक्त

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची यशस्वी शिष्टाई

वेंगुर्ले तालुक्यातील तलाठी पदे रिक्त असल्याने गेली कित्येक वर्ष परबवाडा गावाला तलाठी नव्हता. त्यामुळे महसूल कामासाठी परबवाडा गावातील लोकांना उभादांडा येथे जावे लागत असे. याची कल्पना ग्रामस्थांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना दिली. ग्रामस्थांची अडचण लक्षात घेऊन त्यांनी प्रांताधिकारी सावंतवाडी यांचेशी चर्चा करून आठवड्याचा कीमान एक दिवस तलाठी परबवाडा गावांमध्ये उपलब्ध व्हावा अशी आग्रही मागणी केली . या मागणीची दखल घेत , आठवड्यातील शुक्रवार या दिवशी परबवाडा गावासाठी तलाठी उपलब्ध होईल , असे आदेश निर्गमित केले . त्यामुळे परबवाडा ग्रामस्थांची कित्येक वर्षांपासून असणारी मागणी पूर्ण झाली . आता दर शुक्रवारी परबवाडा गावात तलाठी कामकाजासाठी उपलब्ध होणार आहेत .
प्रथमच तलाठी आंदुर्लेकर मॅडम परबवाडा गावांमध्ये हजर झाले असता यांचे स्वागत परबवाडा सरपंच शमिका बांदेकर यांचे हस्ते पुष्पगुच्छ देवून करण्यात आले .
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना उर्फ बाळू देसाई, उपसरपंच पपू परब, ग्राम. सदस्य हेमंत गावडे, संतोष सावंत, कार्तिकी पवार, अरुणा गवंडे, हळदणकर, स्वरा देसाई, मनवेलं फर्नांडीस, ग्रामसेवक प्रवीण नेमण, रवी परब, संदीप परब, स्वप्नील परब, लवू सावंत, ग्रामपंचायत कर्मचारी राजा परब, सिद्धेश कापडोस्कर, प्रियांका किनळेकर उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 17 =