You are currently viewing बांद्यात उद्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

बांद्यात उद्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

बांदा

रविवारी दि. १५ जानेवारी २०२३ रोजी रोटरॅक्ट क्लब आॅफ रायजिंग युथ बांदा, रोटरी क्लब आॅफ बांदा, डाॅ. संदिप फाऊंडेशन बांदा आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा-सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि GMC रक्तपेढीच्या सहकार्याने जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं. १ येथे सकाळी ९:३० ते दुपारी ०१:३० या वेळेत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.

या श्रेष्ठ समाजकार्यासाठी मोठ्या संख्येने शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान करण्यासाठी रक्तदात्यांना विनम्र आवाहन करीत आहोत. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी बहुसंख्येने रक्तदान करुन आपण हा उपक्रम यशस्वी करुया.

तरी याप्रसंगी रक्तदान करणार्‍या रक्तदात्यांनी अक्षय मयेकर (9503871924), बाबा काणेकर (9823661133), संकेत वेंगुर्लेकर (9011107562) तसेच निलेश मोरजकर (9763717790) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × three =