You are currently viewing निलेश राणेंनी दिलेला शब्द पूर्ण केला..

निलेश राणेंनी दिलेला शब्द पूर्ण केला..

*पोखरण-कुसबे गावात जिओ टॉवरसाठीच सर्व्हेक्षण पूर्ण..*

 

कुडाळ :

काही दिवसांपूर्वीच पोखरण-कुसबे गावातील शिवसैनिक व कुसबे ग्रामस्थांनी भाजपा नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. या प्रवेशावेळी कुसबे ग्रामस्थांनी गावात जिओ टॉवरची मागणी केली होती. त्यावर बोलताना निलेश राणे यांनी येत्या महिन्याभरात जिओ टॉवरचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज जिओ अधिकाऱ्यांची टीम टॉवरच्या सर्व्हेसाठी पोखरण गावात दाखल झाली. यावेळी भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर, पोखरण- कुसबे गावचे संदीप बागवे, सचिन सावंत, आदी उपस्थित होते. टॉवरसाठीच सर्व्हेक्षण पूर्ण झालं असून येत्या महिन्याभरात सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर टॉवरच्या कामाला सुरुवात होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 − 1 =