कणकवली :
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने हेल्मेट तुमच्यासाठी सुरक्षा कुटुंबासाठी असे सांगत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२३ अंतर्गत कणकवली हेल्मेट जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या दिनांक १४ जानेवारी रोजी हि रॅली हेल्मेट चे महत्व लोकांमध्ये पटवून देण्यासाठी सकाळी १० वाजता कणकवली बस स्टॅन्ड पासून सुरुवात करण्याचे आयोजन केले आहे.
बस स्टॅन्ड पासून कणकवली सर्विस रोड वरून तरंदळे फाटा येथून फिरून पुन्हा माघारी श्रीधर नाईक चौक मध्ये आल्यानंतर नरडवे रोड रेल्वे स्टेशन पर्यंत जाऊन तेथून कणकवली बस स्टैंड वर येणार आहे. यामध्ये बहुसंख्या हेल्मेट परिधान केलेले दुचाकीस्वार सहभागी होणार आहेत. या सहभागी हेल्मेट धारक व्यक्तींना गुलाब पुष्प देऊन सहभाग प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे. त्यामुळे बहुसंख्य कणकवलीतील नागरिकांनीही यामध्ये सहभाग घेण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग नंदकिशोर काळे यांच्या वतीने करण्यात येत आहे.