You are currently viewing भांडुप एस विभागाचे मलेरिया निरिक्षक सदानंद वसंत दळवी यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी कर्मचाऱ्यांकडून आठवणींना उजाळा !

भांडुप एस विभागाचे मलेरिया निरिक्षक सदानंद वसंत दळवी यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी कर्मचाऱ्यांकडून आठवणींना उजाळा !

भांडुप एस विभागाचे मलेरिया निरिक्षक सदानंद वसंत दळवी यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी कर्मचाऱ्यांकडून आठवणींना उजाळा !

मुंबई –

“कोरोना सारख्या महामारीने मानव जातीला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात येत असताना आमच्या आरोग्य विभागातील मलेरिया निरिक्षक सदानंद वसंत दळवी हे मुळात स्वच्छताप्रिय कर्मचारी म्हणून सेवेत परिचित होते. खरं तर ही चांगली गोष्ट आहे. आरोग्य सेवेत राहून त्यांनी विविध छंद जोपासले आहेत. त्यांनी आता नव्याने काही तरी करण्याचा प्रयत्न करावा” असे भांडुप एस विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश वायदंडे यांनी दळवी यांच्या सेवानिवृत्ती समारंभ प्रसंगी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पकरंडक  प्रदान करून सन्मानित करताना प्रतिपादन  केले.
यावेळी आपल्या सत्कारादाखल बोलताना सदानंद दळवी यांनी आजच्या दिवशी माझ्याबद्दल आपण सर्वजण व्यक्त झालात ते पाहता मी भारावून गेलो. आपल्या सोबत व्यतीत केलेला सहवास सैदव स्मरणात राहील. तसेच आपण मला घरच्या सदस्यासारखे वागविले  आणि जे सहकार्य केले त्याबद्दल आपल्या सर्वांचा ऋणी असल्याचे नमूद केले. सौ. श्रध्दा दळवी म्हणाल्या की, पुस्तक वाचनासोबत बऱ्याच आवडी निवडी भरपूर आहेत. पण दळवी यांचे स्वच्छतेचे काही किस्से सांगून विविध पैलू उलगडून सांगितले. यावेळी मयुरी दळवी, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक सुरेश पवार, नित्यानंद पाटील, मलेरिया निरिक्षक नागेश अबुर्ले,  प्रेरणा वाझे, आसावरी लाडके, अन्वेषक अमोल चव्हाण, आदींनी दळवी यांच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी श्रद्धा दळवी यांना प्रेरणा वाझे, सुनंदा सोनावणे यांच्या हस्ते सौभाग्याचे लेणे देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यालयातील कर्मचारी वृंदाच्यावतीने दळवी यांना भेट प्रदान करून गौरविण्यात आले. या रंगातदार सोहळ्याचे सूत्रसंचालन मलेरिया निरिक्षक रविंद्र जाधव यांनी अतिशय सुबक केले. तर आभारप्रदर्शन स्वच्छता निरीक्षक मिलिंद पारकर यांनी केले.

फोटोकॅप्शन :
एस विभाग भांडुप आरोग्य विभागातील मलेरिया निरिक्षक सदानंद वसंत दळवी यांना वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश वायदंडे सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करताना सौ. श्रध्दा दळवी, मयुरी दळवी, मलेरिया निरिक्षक रविंद्र जाधव प्रकाशचित्रात दिसत आहेत. (छाया – प्रमोद कांदळगावकर)

*संवाद मीडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*

१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!

*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*

*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*

*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा