You are currently viewing सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालकपदी अभिमन्यू लोंढे व गुरू पेडणेकर

सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालकपदी अभिमन्यू लोंढे व गुरू पेडणेकर

सावंतवाडी

येथील खरेदी विक्री संघाच्या तज्ञ संचालकपदी पत्रकार अभिमन्यू लोंढे आणि गुरू पेडणेकर यांची आज निवड करण्यात आली. यावेळी संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान गोवा बागायतदार बाजाराला साजेशे काम करून सावंतवाडी खरेदी विक्री संघाचा आलेख वाढविण्यासाठी नव्या संचालक मंडळाने प्रयत्न करावेत, जास्तीत जास्त शेतकरी बागायतदारांना फायदा मिळवून द्यावा, असे आवाहन श्री. तेली यांनी यावेळी केले. आज संस्थेची संचालकांची निवड प्रक्रिया झाली. यात तज्ञ संचालक म्हणून माजी अध्यक्ष असलेले श्री. लोंढे आणि पेडणेकर यांना संधी देण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग, माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे प्रवक्ते संजू परब, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, प्रविण देसाई, दत्ताराम कोळमेकर, ज्ञानेश परब, शशिकांत गावडे, भाई राऊळ, आत्माराम गावडे, भगवान जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. तेली यांनी दोन्ही संचालकांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, याठिकाणी जिल्ह्यात सहकार क्षेत्रात गेल्या काही दिवसात चांगले काम सुरू आहे. याठिकाणी शेतकरी आणि बागायतदारांच्या विविध अडचणी सोडविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सोसायट्यासह जिल्हा बँक सुध्दा भाजपाच्या ताब्यात आले. आता या ठिकाणी तज्ञ संचालक म्हणून दोन संचालक घेण्यात आले आहे. त्याचा फायदा खरेदी विक्री संघाच्या भल्यासाठी होण्याबरोबर याठिकाणी अवलंबून असलेल्या अन्य सदस्यांना सुध्दा त्याचा फायदा होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत आणि ते होतील असा विश्वास आहे. यावेळी उपस्थित अन्य पदाधिकार्‍यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या. संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी सर्वच संचालक मंडळाकडुन आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 3 =