You are currently viewing गोव्याला जाताना भीषण अपघातात 11 जण ठार

गोव्याला जाताना भीषण अपघातात 11 जण ठार

कर्नाटकात आज शुक्रवारी (15 जानेवारी) पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास NH4 वर धारवाड तालुक्यातील ईट्टगट्टी गावाजवळ बायपासवर झालेल्या भीषण अपघातात 11 जण ठार झाले आहेत. दावणगिरीहून गोव्याला जाणारी मिनी बस आणि बेळगावहून हुबळीकडे जाणाला टिप्पर दरम्यान हा अपघात झाला. बसमधील 10 महिलांचा मृत्यू झाला आहे आणि काहींची प्रकृती गंभीर आहे. तर टिप्पर मधील एकाचा मृत्यू झाला आहे.
मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी 17 महिला गोव्याला निघाल्या असताना काळाने घाला घातला. एकूण 17 महिला मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी गोव्याच्या दौर्‍यावर निघाल्या होत्या. देवनगरेतील महिलांच्या क्लबच्या त्या सदस्या होत्या. पहाटे 3 वाजताच्या सुमारास टिप्परने टेम्पो ट्रॅव्हलरला धडक दिली. या अपघातात 10 महिलांचा जागीच मृत्यू झाला. प्रवासात झोपलेल्या असतानाच महिलांवर संक्रांत कोसळली. गोव्याला पोहोचण्यापूर्वी धारवाडजवळच भीषण अपघातात 10 जणींना प्राण गमवावे लागले.
धारवाड ग्रामीण स्टेशन पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आहे. जखमींना किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहितीनूसार या महिला डाँक्टर असल्याची शक्यता आहे. धारवाड ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक महेंद्रकुमार यांच्या उपस्थितीत टेम्पो गाडीमध्ये अडकलेले दहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातात 5 महिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर हुबळीतील किम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दोघी जणींना किरकोळ दुखापत झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + four =