You are currently viewing मळेवाड येथे अपघातात रशियन पर्यटक जखमी

मळेवाड येथे अपघातात रशियन पर्यटक जखमी

सावंतवाडी

सावंतवाडी शिरोडा मार्गावर मळेवाड जकातनाका येथे दुचाकी घसरून परदेशी पर्यटक अँलेक्स ( मूळ रा.रशिया) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्याच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली असून अधिक उपचारासाठी त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातग्रस्त विदेशी पर्यटकाला विश्वास चराटकर, प्रसाद राऊत, मनीष केरकर, सुमेश शिंदे या युवकांनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा