You are currently viewing पणदूर सविता आश्रम येथे आज सार्वजनिक शोषखड्डा प्रकल्पचा शुभारंभ

पणदूर सविता आश्रम येथे आज सार्वजनिक शोषखड्डा प्रकल्पचा शुभारंभ

कुडाळ पं. स. एकाच दिवशी ७४ गावांमध्ये राबविणार हागणदारीमुक्त प्रकल्प..

 

कुडाळ :

 

कुडाळ येथील पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील ७४ गावामध्ये एकाच दिवशी हागंणदारीमुक्त (ओडीएफ ++) प्रकल्प राबविण्यात येणार आहे. असा उपक्रम राबवणारी राज्यातील ही पहिली पंचायत समिती असून ३१ मार्च पूर्वी हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. दरम्यान पणदूर येथील संविता आश्रम येथे आज या प्रकल्पाचा शुभारंभ झाला. कुडाळ पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली या समितीचे सर्व विभाग विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात नेहमीच राज्य पातळी अग्रेसर ठरले आहे. यशवंत पंचायत राज अभियान, महाआवास अभियान, बाबू लागवड, स्वच्छता अभियान, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, विधवा प्रथा बंद, पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रम आदि विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. हे सर्व उपक्रम जिल्ह्यासह कोकण व राज्यातील आदर्शवत ठरले आहेत. आता तर कुडाळ तालुक्यात 74 गावात एकाच दिवशी हागणदारीमुक्त (ओ डी एस प्लस) प्रकल्प राबविण्याचा उपक्रम हाती घेतला असून 31 मार्च 2023 पूर्वी हा प्रकल्प पूर्ण होणार आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली.

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत कुडाळ पंचायत समितीच्या वतीने आज सार्वजनिक कंपोस्ट खड्डा व शोषखड्डा दिन एकाच वेळी बांधण्याचा संकल्प असून हा संकल्प राबवणारी कुडाळ समिती राज्यात पहिली ठरणार आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कुडाळ तालुक्यातील एकूण 68 ग्रामपंचायतीकडे 122 महसूल गावे ही हागणदारीमुक्त झाली असून 28 ग्रामपंचायतीकडील 29 महसूल गावही हागणदारीमुक्त अधिक (Odf) झालेली आहे. शिल्लक 40 ग्रामपंचायतीकडील 74 महसूल गावे ही हागणदारी मुक्त अधिक(Odf++) करावयाची असून त्याचाच एक भाग म्हणून सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत तालुक्यातील एकूण 49 ग्रामपंचायतीकडील 65 महसूल गावांमध्ये शोषखड्डा/खतखडा/लिजपिट/बांधव खतखडा बांधण्यात येणार आहे पंचायत समिती पुढारी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कामाचा उच्चांक वाटला असून तालुक्यात एकूण पन्नास ग्रामपंचायतीकडून 65 महसूल गावांमध्ये 79 सार्वजनिक शोष खड्डे, 104 सार्वजनिक खतखडे, 15 नडीपखड्डे, १४ लीज पीठ व चार गांडूळ खत युनिट बांधून एकाच वेळी बांधून पूर्ण करण्याचा संकल्प केला. आज पणदूर येथे या कार्यक्रमाचा शुभारंभ प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उदय पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, विशाल तनपुरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा विभाग विनायक ठाकूर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सहाय्य गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब, पणदुर सरपंच पल्लवी पणदुरकर, उपसरपंच साबाजी मसके, ग्रामसेविकास सपना मसगे, सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थित पार पडला. या उपक्रमासाठी विस्तार अधिकारी नेमले आहेत. सांडपाणी घनकचरा नियोजन प्लास्टिक गोळा करणे, विलगीकरण करणे हा महत्त्वाचा उपक्रम आहे. मागील वर्षी या अभियानात पश्चिम महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हापरिषद राज्यात दुसरी आली होती. हा सन्मान मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर व विनायक ठाकूर यांनी दिल्ली येथे स्वीकारला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four − one =