*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे यांचा लेख*
*रेशन तांदूळ चोर*
गोरगरीब हातावरचे पोट असणारे सर्वसामान्य लोक यांना दोन वेळच पोटभर जेवण मिळावे यासाठी आपलं प्रशासन कटिबद्ध आहे. पूर्वी चे काळात आपली अन्नाची गरज भागविण्यासाठी परकियांच्या आश्रयाखाली आपणांस राहावे लागत होत अन्न धान्य परदेशातून आयात करावे लागत होतें. आपल्या भारतात बदल होत गेले. आणि आधुनिक खते. बी बियाणे . आधुनिक शेती औजारे. पाणी साठवण प्रशिक्षण . यामुळे आपल्या देशात धान्य मुबलक पिकायला लागलं. आणि ** हरित क्रांती** झाली आणि आपणांस परकयाचया आश्रयाची गरज भासली नाही. आपल्या लोकांना पुरेसे धान्य मिळून शिल्लक पडेल एवढ धान्य आपल्याकडे शिल्लक राहायला लागले.
अन्न धान्य लोकांच्या पर्यंत रास्त आणि स्वस्त दरात मिळावं यासाठी रेशन दुकान ही संकल्पना शासनाने अमलात आणली लोकांना धान्य पुरवठा करताना आर्थिक दुर्बलता असणारे निवडलं गेलं. त्याचा सर्वे शहरी आणि ग्रामीण 49हजार आणि 59 हजार अशा उत्पन्न मर्यादा असणारे लाभार्थी करण्यात आले आणि वाटप सुरू झाले. 2005 साली पुन्हा एकदा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सर्वे झाला पण तो राजकीय तत्वावर झाला खरोखरच गरिब असणारे या सर्वे मधून वगळण्यात आले आणि आर्थिक सबल. घरदार. शेती. नोकरी. असणारे लोक त्यामध्ये बसले आणि त्यांनी आजही रेशन अन्न धान्य चोरले आहे यासाठी शासनाने विविध योजना राबविण्यात आल्या अशा बोगस शिधापत्रिका धारकांना शोधण्यासाठी * अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम* स्व इच्छेने रेशन अधिकार सोडावा यासाठी आव्हान केले * मयत लोकांची नावं कमी करणं* रेशनकार्ड ला आधार सिडींग करणे* पण या सर्व शासकीय योजनांचा कोणताही कसलाही निकष निघाला नाही . आणि चोर आहेत असेच पुढेही राहणार हे खरंच आहे.
आज शासकीय रेशन तांदूळ वर्षभर मोफत देण्यासाठी शासनाने /2021 /2022/2023 या सालामधये कोणीही उपाशी राहू नये यासाठी गरिब कल्याण योजना सुरू केली आहे कमीतकमी 80 लाख लोक आजही या मोफत रेशन अन्न धान्य याचा लाभ घेत आहेत. हे लाभ घेणारे खरोखरच गरिब आहेत कां?? आर्थिक सबल लोकांना मिळणारे रेशन मोफत अन्न धान्य आजही बाजारात विकले जात आहे. काहीजण हेच धान्य जनावरांना खायला घालत आहेत. तर काही जण मोफत मिळणारे तांदूळ १५/२०/ रुपयांनी कीलो बाजारात विकत आहेत. याची सर्व बातमी संबंधित पुरवठा विभागास आहे पण कारवाई शुन्य आहे.
जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या वर्गातील २ लाख ८९ हजार विद्यार्थ्यांfना शालेय पोषण आहार देण्यासाठी दर दोन महिन्याला १२०० टन तांदूळ लागतो. पण, सध्या जिल्ह्यातील २५०० शाळांमधील १०० टक्के तांदूळ संपला असून अजूनही पुरवठा विभागाकडून मिळालेला नाही. त्यामुळे सध्या पोषण आहारात खंड पडेल, अशी स्थिती जिल्ह्यातील शाळांमध्ये निर्माण झाली आहे.पहिली ते आठवीच्या २५०० अनुदानित शाळांमधील २ लाख ८९ हजार विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जाताे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी शाळांमधील तांदूळ संपल्यामुळे मुलांचे हाल होत आहेत. संबंधित तालुका ठिकाणी असणार्या आश्रम शाळा यांना दोन रुपये किलोने रेशन तांदूळ देण हे शासन निर्णयानुसार आहे पण आज अशा गोरगरीब लोकांच्या मुलांना हा तांदूळ दिला जात नाही . मग यांच्या हिस्सयाचा तांदूळ जातो तरी कुठ ??
, तांदळाचा पुरवठाच हाेत नसल्यामुळे अनेक शाळांमधील पोषण आहार संद्या बंद आहे. काही शाळांनी उधारी करुन आठवडाभर पोषण आहार चालू ठेवला होता. पण, गेल्या पंधरा दिवसापासून तांदूळ संपूनही प्रशासनाकडून त्याचा पुरवठा झाला नाही, असे जिल्हा परिषद शाळांमधील मुख्याध्यापकांचे मत आहे.तांदळाची टंचाईशालेय पोषण आहारासाठी लागणारा तांदूळ दोन महिन्यातून एकदा उचलला जातो. जिल्ह्यातील २५०० शाळांना दोन महिन्यासाठी १२०० टन तांदळाची गरज आहे. गेल्या महिन्याभरापासून शाळांमधील तांदूळ संपला असून काही शाळांमध्ये शिल्लक असलेल्या तांदळावर कस तर पंधरादिवस पोषण आहार चालू होता. सध्या पूर्णच तांदूळ संपला असून तातडीने १२०० टन तांदळाची गरज आहे, अशी फसवी उत्तरे लोकांना संबंधित विभाग देत असतो आणि एकीकडे बाजारात. राईस मिल मध्ये टनामधये . गाड्यांच्या गाड्या रेशन तांदूळ सापडतो तो कुठुन येतो यासाठी पुरवठा विभाग. गोदाम निरिक्षक. यांच्या देखरेखीखाली हा चोरीचा व्यवसाय चालतो कां?? प्रश्न बरेच आहेत.
तांदूळ हे कोकणातील सर्वात जास्त पिकणारे धान्य आहे. कच्चे तांदूळ हे शिजवून त्यापासून भात तयार केला जातो भारतात व अन्य ठिकाणी तांदळाच्या विविध जाती आढळतात त्या खालील प्रमाणे आहेत . आजरा घनसाळ, आंबेमोहोर, इंद्रायणी
कमोद, काळी साळ, कोलपी, कोलम (वाडा कोलम), कोळंबा, खडक्या, गरा कोळंबा, गोदवेल, घनसाळ, घुड्या
चिन्नोर, चिमणसाळ, जिरगा, जिरवेल, जिरेसाळ, जीर, झिनी, झिल्ली
टाकळे, डामगा, डामरगा, डोंगर, डोंगरे, ढवळा
तांबकुडय, तांबसाळ, तामकुड, धुंड्या वरंगळ
पटण, पटणी, पठारी कोळंबा, परिमल, पाटणी, पाटनी, पांढरी साळ, बासमती, बुगडी तांदूळ, भोगावती, मालकुडई, मासडभात, माळपटणी, मुडगा, मुंडगा, मुडगे, मुंडगे, मोगरा
रत्नागिरी, राजावळ, राता, रायभोग, वरगल, वरंगल, वरगळ, वरंगळ, वाकसळ, वाकसाळ, शेप्या वरंगळ, सकवार, सुरती
हरकल, हरकल पटनी, हळा कोळंबा
तामिळनाडूमधील जाती
कादिरमंगलम्
कर्नाटकातील जाती
नाटी, बरबट्ट, मोलबट्ट,
इतिहासातील नोंदींनुसार चीनमधील यांगत्से नदीच्या खोऱ्यात इ.स.पू. सहा ते सात हजार वर्षांपूर्वी तांदुळाची शेती सुरू झाली होती. तर भारतात गंगेच्या खोऱ्यात इ.स.पू. दोन हजार वर्षांपूर्वी तांदुळाची शेती सुरू झाली होती. पुरुमुगम यांच्या मते “चीनमधील व्यापाऱ्याच्या मार्फत तांदूळ भारतात गेला असावा आणि तेथे स्थानिक प्रजातीबरोबर त्याचा संकर झाला असावा. याचाच अर्थ जो तांदूळ आपण भारतीय मानतो तो चीनमधून आला असावा.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मार्केट यार्ड मधील एका दुकानात रेशनचा तांदूळ विक्रीसाठी आणून ठेवला आहे.अशी माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे पथक एकाच वेळी तिथे पोहोचले. त्यामुळे काही काळ कारवाईवरून चांगलीच शाब्दिक चकमक झाली होती ही कारवाई नेमकी कोणी केली याबाबत ही शाब्दिक चकमक झाली मात्र अखेर संयुक्त कारवाई म्हणून कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल होत आहे.
सरकार एकिकडे गोरगरिबांसाठी धान्य मोफत देत असताना हे धान्य गरिबांच्या पोटात न जाता धनदांडग्या व्यापाऱ्यांच्या दुकानात जाऊन त्याची परस्पर विक्री होत आहे. याबाबत मागील महिन्यात आवाज महाराष्ट्र या वेब न्यूज पोर्टलवरून एक बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती अहमदनगर शहरात कशाप्रकारे रेशनच्या मालविक्रीचे रॅकेट सुरू आहे याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली होती मात्र जिल्हा पुरवठा विभाग नेमका काय करतो असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.
ग्रामिण पोलिस १३ नोव्हेंबर ला रात्री १२ वाजता ration rice घटनास्थळी दाखल झाले आणि तांदळाने भरलेले वाहन पोलिसांनी ताब्यात घतले. चौकशी दरम्यान एमएच ३२ यु ०४४० क्रमांकाच्या टाटा एसी वाहनात तांदळाने भरलेले १५ ते २० कट्टे आढळुन आले. यावेळी पोलिसांनी वाहन चालकाला समज देऊन सोडुन दिले आणि वाहन जप्त केले. पुढील चौकशीसाठी कारंजा तहसील कार्यालयातील अन्न व पुरवठा विभागाशी पत्र व्यवहार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुरवठा विभागच्या तपासनी नंतर पकडलेला तांदुळ रेशनचा आहे किंवा नाही याचा उलगडा होणार असून, त्यानंतर पुढील कारवाई केल्या जाईल. ही कारवाई ठाणेदार धंदर यांच्या मार्गदर्शनात ग्रामिण पोलिसांनी केली
शासन निर्णय आणि केंद्र सरकारच्या आदेशांना पायदळी तुडवून बारदानाऐवजी प्लॅस्टिक बॅग्स मध्ये हे तांदूळ आणले जात आहे. हेच तांदूळ रेशनवर उपलब्ध करुन दिले जाते. यामधून महाराष्ट्राच्या रेशनवर कर्नाटकचा तांदूळ असे धक्कादायक चित्र आज समोर आले आहे. तब्बल 1 कोटी 34 लाख रुपयांचा हा धनंजय मिलर्स घोटाळा श्रमजीवीच्या तरुणांनी समोर आणला आहे. आज शहापूरच्या शासकीय गोदामात गैरव्यवहाराचा हा तांदूळ येणार असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचया पदाधिकारी यांना मिळाली होती. श्रमजीवी संघटनेच्या टीमने गोदामात धडक दिली. यावेळी याठिकाणी कर्नाटक नोंदणीकृत असलेली मोठे ट्रक तांदूळ उतरवताना दिसले. या ट्रकमध्ये प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये 50-50 किलोच्या 500 बॅग्स आणण्यात आल्या होत्या. वाहन चालक मोहमद जफर याला विचारले असता त्याने सांगितले की, हा सगळा तांदूळ कर्नाटक, हुबळी येथून तिथल्या दलालामार्फत आणला असल्याचे त्याने सांगितले. जेव्हा येथील शासकीय गोदाम पालक एस. व्ही. भगत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, हा तांदूळ रायगड जिल्ह्यातल्या तळेगाव येथील धनंजय राईस मिलमार्फत आला आहे. ट्रान्स्पोर्ट पासवर देखील रायगड येथून आल्याचे नमूद होते. मात्र प्रत्यक्षात हा तांदूळ कर्नाटक वरुनच आल्याचे निष्पन्न झाले आहे. 11 ऑक्टोबर 2018 च्या शासन निर्णयानुसार तसेच केंद्र सरकारच्या निर्देशानुसार बारदान कलर कोडिंग बाबत नियमावली आहे. मात्र त्याचा भंग करत प्लॅस्टिक बॅग चा सर्रास वापर करुन हा तांदूळ काळ्या बाजारात जाण्यासाठी पोषक वातावरण तयार केले जात आहे. असा आरोप श्रमजीवी संघटना यांनी केला आहे. या भरडाई प्रक्रियेत 400 क्विंटल भाताच्या एका लॉटला 40 रुपये प्रतिक्विंटल दराने 16 हजार रुपये शासनाकडून मिळतात. तसेच हा भात गोदाम ते मिलपर्यंत नेण्यासाठी शासनाच्या किलोमीटर दराप्रमाणे वाहतूक भाडे घेऊन हा रेशनचा तांदूळ विविध भागातील बाजारपेठा. राईस मिल यामध्ये एजंट दलाल अधिकारी कर्मचारी यांना हाताशी धरून लुट केली जात आहे.
रेशनचा तांदूळ पकडलाधान्याची काळाबाजारी थांबेना : राशनचा होणारा काळाबाजार हा काही नवीन नाही. मागील कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने स्वस्त धान्य दुकानदारामार्फत मोफत धान्य वाटप सुरू केले होते. ते मागील दोन वर्ष सतत देण्यात आले; परंतु शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले होते. त्यानंतर शेतकऱ्यांचा रेटा हे मोफत धान्य मिळावे यासाठी आंदोलने निवेदने दिल्यानंतर हे धान्य पूर्ववत सुरू करण्यात आले. असे असताना प्रशासनाने स्वस्त धान्य किंवा मोफत मिळणाऱ्या धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी ई पॉज मशीन आणली. परंतु ती देखील या काळ्या बाजाराला रोखू शकले नाही. अजूनही सर्रासपणे स्वस्त धान्य दुकानातील धान्य काळ्या बाजारात विकले जात असल्याची उदाहरणे सातत्याने समोर येत आहेत. यातीलच हा एक प्रकार समोर आला आहे
सांगली जिल्ह्यात २०२१ मध्ये कोरोना काळांत एकाबाजूला लोक गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये जारी करण्यात आलेल्या टाळेबंदी मुळं घरातच अडकून पडली हाताला काम नाही हातात पैसा नाही यामुळे लोकांच्या वर उपासमारीची वेळ आली होती त्यावेळी शासनाने गरिब कल्याण योजना सुरू केली प्रती व्यक्ती प्रती महिना पाच किलो तांदूळ मोफत अशी योजना होती. लोकांना खाण्यास तांदूळ नाही अश्यावेळी सांगली जिल्हा ग्रामीण पोलीस यांनी सापळा रचून मिरज. बिऊर येथील राईस मिल मध्ये टनामधये रेशन तांदूळ जप्त केला म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात तांदूळ आला कोठून यासाठी पुरवठा अधिकारी. गोदाम निरिक्षक यांच्या देखरेखीखाली हा सर्व चोरीचा बाजार सुरू आहे. त्यांनंतर जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यातील हा दुसरा घोटाळा असून मागील काही महिन्यात पूर्वी तत्कालीन तहसीलदार यांनी चक्क धान्य वाटपाच्या अनुदानावरच डल्ला मारल्याचे तक्रार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली होती.या संबंधित सांगली जिल्ह्याचे उप जिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठाधिकारी यांनी संबंधित चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले, मात्र ते अश्वासन वेळ निधून गेल्या नंतर आश्वासन हवेत विरघळ्याचे आता सामाजिक कार्यकर्ते बोलू लागले आहेत.हा रेशनिग घोटाळा सांगली जिल्ह्यापुरता मर्यादित नसून राज्यभर याची व्यापती असल्याचा आरोप आपणांस नाकारता येणार नाही.
आदिवासी महामंडळाचा कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. कर्नाटकातील काळ्या बाजारातील लाखो टन तांदूळ ठाणे जिल्ह्यात आणण्यात येत आहेत. श्रमजीवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला. श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांना कर्नाटकातून हा तांदूळ येणार असल्याची माहिती मिळाली, त्यावरुन त्यांनी तांदूळ वाहून नेणारा कर्नाटकचा ट्रक अडवला. त्यानंतर हा सर्व घोटाळा समोर आला.
पोलिसांनी बुट्टीबोरीमधील त्या दुकानात छापा मारला असता त्या ठिकाणी आणखी काही पोती काळाबाजारासाठी जाण्याच्या तयारीत होते. त्यावरून ही कारवाई करत दोन आरोपींना अटक करण्यात आली. जवळपास 8 लाख रुपये किमतीचे गहू आणि तांदूळ जप्त करण्यात आले. अन्न वितरण विभागाला याची सूचना देण्यात आली असल्याची माहिती कळमनाचे पोलीस निरीक्षक बी. एस. नरके यांनी दिली. रेशनच्या दुकानात मिळत असलेलं हे धान्य गरिबांना कमी किमतीत मिळणार असतं. यावर अनेक गरिबांचं घर चालतं. मात्र दुकानदार किंवा दलाल मात्र हे बाहेर मार्केटमध्ये विकून गरिबांवर अन्याय केला जातो, याची पाळंमुळं शोधून काढण्याची गरज आहे.
गोदाम तपासणी पडताळणी करण्याचा अधिकार सर्वांना आहे.आपण लोकशाही राज्यात राहतो. पण बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांचेकडे पत्र व्यवहार करुन ही जबाबदारी मागितली असता आम्हाला २०१७ चा शासन निर्णय दाखविला आणि आम्हाला परवानगी नाकारली. परवानगी नाकारली याचे कारण रेशन दुकान पुरवठा अधिकारी. मंत्री. यांचें लागेबांधे सापडले असते आणि यांचें पितळ उघडे पडले असते. आपल्या तालुक्यातील गोदाम तपासणी पडताळणी कधी झाली. अधिकारी कोण होत आपणांस काय माहित आहे कां??
रेशन गोदामधील वाहनं किती.?? वाहनांवर जीपीएस टॅग आहे कां?? वाहनात वजनानुसार रेशन धान्य भरलं जातं कां?? रेशन धान्य वजन करण्यासाठी वापरले जाणारे वजन काटे पासिंग कुठ केले जातात?? रेशन दुकानदार यांचें वजनमापन केलें जाते कां?? रेशन दुकानदार रास्त धान्य युनिट नुसार वाटप करतात कां?? रेशन दुकान वेळेवर उघड असतं कां??
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
9890825859