You are currently viewing दशावतारी हार्मोनियम वादक अरुण राणे यांचे निधन

दशावतारी हार्मोनियम वादक अरुण राणे यांचे निधन

कणकवली

कणकवली तालुक्यातील हळवल गावचे सुपुत्र प्रसिद्ध गणेश मूर्तिकार तथा दशावतारी हार्मोनियम वादक अरुण शंकर राणे ( वय ६० वर्षे, मधलीवाडी) यांचे गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. अतिशय मनमिळावू आणि सुस्वभावी म्हणून परिचित असलेल्या अरुण राणे यांच्या जाण्याने हळवल गावावर शोककळा पसरलीय त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ, बहिणी पुतणे, नातू असा परिवार आहे. रात्र दशावतारी फेसबुक पेजचे एडमिन अमोल राणे व युवा मूर्तिकार अतुल राणे यांचे ते वडील होत. हळवल येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − three =