You are currently viewing कर्जदारांना कर्जाचे हप्ते भरण्यासाठी केली जाणारी दमदाटी त्वरित थांबवा – डॉ.निलेश राणे

कर्जदारांना कर्जाचे हप्ते भरण्यासाठी केली जाणारी दमदाटी त्वरित थांबवा – डॉ.निलेश राणे

रत्नागिरी-

कोरोना लॉकडाऊनमुळे रत्नागिरीतील नागरिकांचे खूप हाल झाले आहेत. उद्योग धंदे बंद, रोजगार ठप्प, हाताला काम नाही, खिशात दाम नाही अश्या कठीण परिस्थितीत सर्व सामान्य नागरिक चिंतेत असताना बजाज फायनान्स कडून कॉल सेंटर मधून नागरिकांना कर्जाचे हप्ते भरण्यासाठी नाहक त्रास दिला जात आहेत. जिल्ह्यातील नागरिक मेटाकुटीला आले आहेत. ज्यावेळी भाजपचे नेते, माजी खासदार डॉ. निलेश राणे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्रस्त नागरीकांनी राणे यांच्याकडे धाव घेत बजाज फायनान्सवाले असभ्य वागणूक देतात, उडवाउडवीची उत्तरे देत महिलांसोबत उद्धटपणा बोलून धमक्या दिल्या जातात अश्या प्रकारच्या समस्या मांडल्या.

यावेळी राणे यांनी त्रस्त नागरिकांच्या समस्या जाणून घेत बजाज फायनान्स मधल्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची झाडाझडती केली. राणे म्हणाले की, कोरोनाच्या काळात जनतेचे खूप हाल झाले आहेत.
रिकव्हरी प्रतिनिधी आणि कॉल सेंटर मधून कर्जदारांना देण्यात येणाऱ्या धमक्या दमदाटी वेळीच थांबवा. रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना कुठल्याही प्रकारचे त्रास झाला तर कुठल्याही टोकाला जायची माझी तयारी आहे, असा थेट इशारा राणे यांनी दिला. यावेळी बजाज फायनान्सचे ब्रँच मॅनेजर विकास दुपटे, रिकव्हरी मॅनेजर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + sixteen =