You are currently viewing स्वराज्य संप्रेरिका राजमाता जिजाऊ.

स्वराज्य संप्रेरिका राजमाता जिजाऊ.

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम काव्यरचना*

🚩 *स्वराज्य संप्रेरिका राजमाता जिजाऊ.*🚩

स्वराज्य संप्रेरिका
राजमाता जिजाऊ,
शिवबासह सर्वांची
सदा बनली ती आऊ…।१।

नमन करीतो आज
राजमाता जिजाबाई,
आम्हा सर्वांची आहात
आपण प्रेमळ आई..।२।

घडविले छत्रपती
शिवरायांना आपण,
आपल्या आशीर्वादाने
स्वराज्य झाले स्थापन..।३।

मुक्त विहरता आले
आनंदाने रयतेला,
वसा घेतला शिवबानी
सुख दिले जनतेला..।४।

सर्व प्रकारे नांदले
भरभराटीचे युग,
सिंहाच्या डरकाळीला
भ्यायचे नाही मृग..।५।

आम्हालाही आशिष द्या
शिवबा सारखे काही,
माता आम्हा असत्याची
भीती वाटणार नाही..।६।

✍🏻 *अख़्तर पठाण.*
*(नासिक रोड)*
*मो.:-9420095259*

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 13 =