You are currently viewing प्रीत गंध

प्रीत गंध

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गझलकार श्री.अरविंदजी ढवळीकर लिखित अप्रतिम गझल रचना*

*प्रीत गंध*

भासेल तुझ्या साठी आयुष्य जाळले मी
इतुकेच प्रिये ठावे मज वचन पाळले मी

घेई कधी परिक्षा नियती तिच्या कलाने
विरहातले विसरले क्षण प्रश्न गाळले मी

हंसलीस प्रेम वदता सारे मला मिळाले
रुसलीस दॆव अडता अश्रू न ढाळले मी

फुलतील कळ्या आतां हे सत्य टोचणारे
त्या पाहण्या बहरता जाणेच टाळले मी

पुसतील तुला वाटा स्वप्नात चाललेल्या
सांगू नकोस त्यांना नव्हतेच भाळले मी

कधि गंध प्रितिचे परि सुचवतील तुजला
माझेच श्वास होते जे केसांत माळले मी

अरविंद २७/४/२०

प्रतिक्रिया व्यक्त करा