You are currently viewing न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालय वेताळ करंडकाचे मानकरी

न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालय वेताळ करंडकाचे मानकरी

वेंगुर्ले

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेताळ प्रतिष्ठान तुळस मार्फत शालेय गटातील स्पर्धांमध्ये सर्वाधिक यश मिळविणाऱ्या शाळेस वेताळ करंडक दिला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा करंडक अत्यंत सन्मानाचा मानला जातो. या स्पर्धांमध्ये शालेय गटासाठी एकपात्री दशावतार, लावणीनृत्य, जोडीनृत्य, समूहगीत, समूहनृत्य, सामान्यज्ञान अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये वेंगुर्ले, कुडाळ, सावंतवाडी, देवगड, मालवण या तालुक्यातील शाळांच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा, तालुका-वेंगुर्ले या विद्यालयाच्या पुढील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले.

यात एकपात्री दशावतारमध्ये वीर नारायण गावडे (प्रथम क्रमांक), जोडीनृत्यमध्ये श्रुती शेवडे व योजना कुर्ले (प्रथम क्रमांक), प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये प्रथमेश भोकरे व आनंद केरकर (प्रथम क्रमांक), समुहनृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक, समूहगान स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक.
या सर्व स्पर्धातील गुणांकनानुसार न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा, वेंगुर्ले हे या वर्षीच्या वेताळ करंडक चा मानकरी ठरले. या यशा बद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक वैभव खानोलकर, इतर सर्व शिक्षक व पालक यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, संस्था चेअरमन वीरेंद्र कामत-आडारकर, संस्था सेक्रेटरी रमेश नरसुले यांनी अभिनंदन केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 13 =