You are currently viewing व्यापारी व करसल्लागार यांच्या संयुक्त सभेचे उद्या कुडाळात आयोजन

व्यापारी व करसल्लागार यांच्या संयुक्त सभेचे उद्या कुडाळात आयोजन

कुडाळ

केंद्र व राज्य सरकारच्या जिएसटी(वस्तू व सेवा कर) खात्याच्या काही नोकरशहांनी मनमानी करीत जिएसटी कायद्यातील कलम१६(४)मधील तरतुदींचा गैर अर्थ लावीत स्वतःचे व्यापाऱ्यांना वेठीस धरल्याच्या अनेक तक्रारी महासंघाकडे प्राप्त झाल्या आहेत.व्यापाऱ्यांनी आपल्या वाट्याचा संपुर्ण कर भरूनही परतावा (रिटर्न) दाखल करण्यास किरकोळ विलंब झाल्याचे कारण देत लाखो रूपयांच्या करपरताव्याची मागणी नाकारली जात आहे;आणि त्याही पलिकडे कर भरलेला असूनही पुन्हा विलंब आकार,दंड आदीं सह करभरणा करण्याच्या नोटीसाही संबंधीतांस पाठवल्या जात आहेत.या ही पुढे जात खात्या कडून संबंधीत व्यापाऱ्याची बॅंक खाती गोठविणे,स्थावर मालमत्तेवर बोजा चढविणे असे प्रकारही खात्या मार्फत सुरू आहेत.

हे कमी की काय म्हणून यावर न थांबता नसलेली थकबाकी वसूल करण्यासाठी संबंधीत घाऊक व्यापाऱ्याच्या कडून माल खरेदी करणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांना सदरच्या घाऊक व्यापाऱ्याच्या बिलाच्या रकमा न देता त्या कर खात्या कडे जमा करण्याच्या ऱ्धमकी वजा सुचना ही जिएसटी खात्या मार्फत दिल्या जात असल्याची बाब महासंघाच्या आज दि.११ जाने.२३ रोजी वेंगुर्ले येथे झालेल्या बैठकीत समोर आली.
एकंदरीतच सर्वसामान्य प्रामाणिकपणे धंदा करून सरकारला करभरणा करणाऱ्या व्यापाऱ्यांना वेठीस धरून त्यांना देशोधडीला लावण्याचे हे मनसुबे उधळून लावण्यासाठी अश्या सर्व प्रकरणांची संपुर्ण माहिती संकलित करून पुढील आवश्यक त्या कार्यवाहीची दिशा निश्चित करण्या साठी जिल्ह्यातील सर्व जिएसटी पिडीत व्यापारी व त्यांचे करसल्लागार यांची सभा शुक्रवार दि. १३जाने. २३ रोजी सायं.३.३०वा. सामाईक सुविधा केंद्र एमआयडीसी कुडाळ येथे व्यापारी महासंघ व जिएसटी टॅक्स प्रॅक्टिशनर्स असो.सिंधुदुर्ग यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.या सभेस सर्व संबंधितांनी वेळीच उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष प्रसाद पारकर व सागर तेली यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा