You are currently viewing जिल्हा नियोजन बैठकीत केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

जिल्हा नियोजन बैठकीत केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

सिंधुदुर्गनगरी :

 

जिल्हा प्रशासनाने बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी माझ्या केंद्रीय सूक्ष्म,लघु,मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. राज्याच्या उद्योग मंत्रांसमवेत, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि नियोजन मंडळाच्या सदस्यांची संयुक्त बैठक घेऊन रोजगारासंबंधातील आराखडा तयार करा. अशा सूचना जिल्हा प्रशासनाला करतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बालकांचे कुपोषण पूर्णतः संपले पाहिजे. प्रत्येक बाळ हे सुदृढ असले पाहिजे. यासाठी मोहीम राबवा.

जिल्हा नियोजन चा आराखडा २५० कोटी पर्यंत तयार करून त्याला तितका निधी ही प्राप्त करून द्या. आवश्यकता भासेल तिथे मी मदत करेनच त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी प्राप्त करून द्या. अशा पद्धतीच्या सूचना जिल्हा नियोजनच्या बैठकीत केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

यावेळी पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी यापुढे निधी कमी पडू देणार नाही. आराखड्या प्रमाणे निधी प्राप्त करून देऊ असा विश्वास व्यक्त केला.

केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जिल्हा नियोजन च्या बैठकीत काही सूचना सभागृहासमोर ठेवल्या त्या पुढील प्रमाणे सूचना आहेत.

▪️जिल्हा डोंगराळ असल्याने रस्ते सुस्थित करा.त्यासाठी जिल्यातील ग्रोथ आराखडा तयार करा.

▪️महामार्गाला जोडणारे रस्ते, सागर आणि पावसाळी पयर्टना साठी पूरक रस्ते व्हावेत.

▪️ जिल्हात कुपोषण ९४५ पैकी ६० बालके ही तीव्र कुपोषित आहेत. त्यासाठी आराखडा तयार करा. कूपोशित बालके सदृढ झाली पाहिजेत. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आमची आवश्यक ती मदत घ्या. असे ही केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

▪️जिल्हात रिक्त ३७८ शासकीय पदे रिक्त आहेत त्या भरा.

▪️सिंधुदुर्ग किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहेत ते व श्री देव कुणकेश्वर, श्रीदेव रामेश्वर, आणि सदस्य सुचवतील त्या मंदिराचा समावेश करून त्यांचा विकास आराखडा तयार करा.

▪️सि वल्ड प्रकल्प झाला पाहिजे, त्यात राजकीय अडथळे सहन करू नका अशा सूचना केल्या.

▪️सूक्ष्म,लघु,मध्यम,उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून रोजगार देण्यासाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून विशेष नियोजन राबवा. त्यासाठी पालकमंत्री चव्हाण,शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची मदत घ्यावी. तशा बैठका लावा. जेणेकरून जास्तीत जास्त रोजगार मिळावा.

▪️रेडी, विजयदुर्ग बंदरचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी काम कितपत झाले याचा आढावा घ्या. त्यासाठी वेळेत बैठका घ्या आणि अंमल बजावनी करा. ३१ मार्च पूर्वी पैसे खरच व्हावेत. तशी कामगिरी करा असे केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + eleven =