You are currently viewing सावंतवाडीत आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर…

सावंतवाडीत आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर…

सावंतवाडी

येथील मिलाग्रीस हायस्कूलमध्ये घेण्यात आलेल्या ५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात प्राथमिक गटातून सोनुर्ली माऊली माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी कृष्णा नाईक याच्यासह माध्यमिक गटातून इन्सुली येथील नूतन माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी प्राची सावंत हीच्या कलाकृतीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. तर प्राथमिक गटातून मळेवाड नं. १ शाळेच्या संजय बांबुळकर तर माध्यमिक गटातून सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या शितल मुरकर यांना प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. याबाबतचे निकाल आज जाहीर करण्यात आले आहेत.

ते पुढील प्रमाणे :- निबंध स्पर्धेत प्राथमिक गटातून श्रावणी विजय सावंत (जिल्हा परिषद शाळा देवसू) प्रथम क्रमांक, वैष्णवी अशोक वाडकर (नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली)द्वितीय क्रमांक, युवराज प्रकाश गावडे (विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस) तृतीय क्रमांक. तर माध्यमिक गटातून धनश्री वासुदेव नाटेकर (श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव)प्रथम क्रमांक, गौरवी आनंद कोठावळे (नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली)द्वितीय क्रमांक, वैष्णवी ईश्वर थडके (विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगाव)तृतीय क्रमांक.

वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गटातून रेश्मा संदेश पालव (नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली)प्रथम क्रमांक, युक्ता प्रसाद साफळे (मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी)द्वितीय क्रमांक, प्रणाली राजन घाटकर (जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोलगाव नं. १) तृतीय क्रमांक. तर माध्यमिक गटातून प्रणव गणपत नाईक (खेमराज मेमोरियल स्कूल बांदा)प्रथम क्रमांक, प्रीती अजय कांबळे (मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी)द्वितीय क्रमांक, चैतन्य प्रदीप गावडे (मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी)तृतीय क्रमांक.

प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्राथमिक गटातून विलास रावजी सावंत, कृष्णा महेश पास्ते (मिलाग्रीस हायस्कूल,सावंतवाडी)प्रथम क्रमांक, योगेश विवेकानंद जोशी, ओजस गोकुळदास मेस्त्री (आरपीडी हायस्कूल सावंतवाडी) द्वितीय क्रमांक, गायत्री राजेश परब, वैभवी उदय बांदलकर (कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी) तृतीय क्रमांक. तर माध्यमिक गटातून तन्मय प्रसाद राणे, इस्रायल अलविन डिसोजा (मिलाग्रीस हायस्कूल,सावंतवाडी)प्रथम क्रमांक, किंजल अविनाश पै, उर्मी गुरुदत्त कामत ( शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल सावंतवाडी)द्वितीय क्रमांक, पार्थ राजेश वाडकर, मानस महेंद्र कोरगावकर (कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी) तृतीय क्रमांक.

विद्यार्थी शैक्षणिक साहित्य प्रतिकृती स्पर्धेत प्राथमिक गटातून कृष्णा विष्णू नाईक (माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली) प्रथम क्रमांक, पियुष सत्यवान चांदरकर (माडखोल नं. २ धवडकी)द्वितीय क्रमांक, प्रणव संदीप पाटील (मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी) तृतीय क्रमांक. तर माध्यमिक गटातून प्राची गोविंद सावंत (नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली)प्रथम क्रमांक, खरीरा नदीम दुर्वेश (सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी) द्वितीय क्रमांक, पियुष रघुनंदन माळकर (मिलाग्रीस हायस्कूल,सावंतवाडी) तृतीय क्रमांक.

शिक्षक शैक्षणिक साहित्य प्रतिकृती स्पर्धेत प्राथमिक गटातून संजय कृष्णा बांबुळकर (मळेवाड नं. १) प्रथम क्रमांक, मनोहर वसंत परब (वेर्ले नं. ३)द्वितीय क्रमांक, दत्ताराम सातू सावंत (माडखोल नं. ६) तृतीय क्रमांक. तर माध्यमिक गटातून शितल शशिकांत मुरकर (सेंट्रल इंग्लिश स्कूल सावंतवाडी)प्रथम क्रमांक, सोनाली उदय बांदलकर (कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी)द्वितीय क्रमांक, वर्षा अमोल राणे (मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी) तृतीय क्रमांक.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × two =