You are currently viewing श्रावणी कोरगांवकर यांचे निधन..

श्रावणी कोरगांवकर यांचे निधन..

सावंतवाडी

मुंबई दादर येथील सौ श्रावणी संतोष कोरगांवकर (वय ४८ ) यांचे मुंबई येथे १३ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. श्रावणी कोरगावकर यांचे माहेर सावंतवाडी असून त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव उमा दिगंबर डुबळे असे आहे. कळसुलकर हायस्कूल, आरपीडी कॉलेज, श्री पंचम खेमराज महाविद्यालय मध्ये शिक्षण घेत असताना क्रीडा क्षेत्रात व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली होती.

सावंतवाडी व शेजारील जिल्ह्यात सावंतवाडीचे नाव विविध स्पर्धामध्ये तिने उंचावले होते. तिच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी आई-वडील, भावंडे व कुटुंबीय असा मोठा परिवार आहे. बापूसाहेब पुतळ्या नजिकच्या देवदत्त स्टोअर्सचे मालक दिगंबर तर पोस्ट कर्मचारी मृणालिनी डुबळे यांच्या त्या कन्या होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा