You are currently viewing २० ते २२ जानेवारी शहर काँग्रेसतर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

२० ते २२ जानेवारी शहर काँग्रेसतर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

कणकवली :

कणकवलीत शहर काँग्रेसतर्फे २० ते २२ जानेवारी रोजी शहर मर्यादित ‘राहुल चषक २०२३’ क्रिकेट स्पर्धा येथील विद्यामंदिरच्या पटांगणावर आयोजित केली आहे. या स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक १०,००० रु. व चषक, द्वितीय पारितोषिक ७,००० रु. व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालीकावीर अशी वैयक्तिक स्वरुपातील बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी अजय मोर्ये (९४२३८०५९८२), राजू वर्णे (९४२२६३२६६३) यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन शहराध्यक्ष अजय मोर्ये यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 4 =