You are currently viewing कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल १००%

कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल १००%

*प्रशालेची कु.सायली सुरेश जांभवडेकर विज्ञान शाखेत ८७.८३% गुण मिळवत जिल्ह्यात द्वितीय तर तालुक्यात प्रथम*

 

वैभववाडी :

 

वैभववाडी तालुक्यातील कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विज्ञान शाखेमधून कु.सायली सुरेश जांभवडेकर हिने ८७.८३% गुण मिळवत विज्ञान शाखेत तालुक्यासह प्रशालेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर कु. दिव्या दत्ताराम गुरव हिने ७५.६७ % गुण मिळवत द्वितीय क्रमांक तर कु. डिंपल प्रकाश माने हिने ७४.८३ % गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे स्थानिक अध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले व प्रोत्साहन दिले. विज्ञान विभाग प्रमुख पाटील पी.ए. तसेच जेष्ठ शिक्षक शिंदे एस. बी., सारंग एफ.एच., मरळकर व्ही.एस., झोरे पी.बी.,चव्हाण वाय.आर., हवालदार एस.इ. यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अधिक्षक तथा स्थानिक अध्यक्ष जयेंद्र रावराणे, प्रशालेचे मुख्याध्यापक नादकर बी.एस. प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग तसेच पालक वर्गाकडून अभिनंदन केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा