You are currently viewing शेतकरी-बागायतदारांचे २६ जानेवारीला विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण…

शेतकरी-बागायतदारांचे २६ जानेवारीला विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण…

संबंधित विभागांना निवेदनाद्वारे दिला इशारा…

वेंगुर्ले

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू, सुपारी व अन्य पीक घेणारे शेतकरी-बागायतदार गेले अनेक वर्षांपासून विविध मागण्यांसाठी लढा देत आहेत. शासन स्तरावरून मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे संतप्त शेतकरी बागायतदारांनी आपल्या मागण्यांसाठी २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित विभागांना दिले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अल्प, मध्यम व खावटी असे विभाजन न करता व कोणतेही निकष न लावता सातबारा कोरा करा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा, अन्यथा शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. सन 2015 ते 2019 मधील महात्मा ज्योतिबा फुले दोन लाखांवरील कर्जदार कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असून मुद्दलाच्या दुप्पट शेतकऱ्यांचे व्याज वाढले आहे. शेतकरी कर्जही भरू शकत नाही. पाच टक्के अनुदानावर कीटकनाशके पुरवणे, बोगस खतांवर नियंत्रण ठेवणे, आंबा कॅनिंग चा दर निश्चित करावा यासह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हयातील आंबा, काजू बागायतदार, व भातशेती पिक घेणाऱ्या शेतकरी संघटनेचे शेतकरी संघटक श्री. शामसुंदर कृष्णा राय, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री. जयप्रकाश चमणकर, उपाध्यक्ष दिव्या वांगंगणकर, सचिव श्री. प्रकाश बोवलेकर, विरेंद्र आराडकर, जगन्नाथ भावकर, आग्नेल कर्नाडीस, महेश चव्हाण, प्रकुल परब व सिंधुदुर्ग जिल्हातील सर्व बागायवादर शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे राय यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 15 =