You are currently viewing राष्ट्रीय काँग्रेस मालवण तालुका कार्यकारिणीची १४ रोजी बैठक

राष्ट्रीय काँग्रेस मालवण तालुका कार्यकारिणीची १४ रोजी बैठक

मालवण

राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव त मालवण था सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक श्री. शशांक बावचकर यांच्या सूचनेनुसार व काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक शनिवार दि. १४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांच्या मालवण फोवकांडा पिंपळ येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार व संघटन बाबींवर चर्चा होणार आहे. तरी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व विभाग व सेलचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 1 =