You are currently viewing रस्ता सुरक्षा अभियानाचे 11 जानेवारी रोजी उद्घाटन..

रस्ता सुरक्षा अभियानाचे 11 जानेवारी रोजी उद्घाटन..

सिंधुदुर्गनगरी :

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियान 2023 राबविण्यात येणार आहे. याचे उद्घाटन बुधवार दि. 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते होणार असल्याची, माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी दिली.
या उद्घाटन समारभांस, प्रमुख उपस्थिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल तसेच विविध खात्याचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − 7 =