रेल्वेने सुरू केली पिक अँड ड्रॉप सेवा..

रेल्वेने सुरू केली पिक अँड ड्रॉप सेवा..

App द्वारे करू शकाल बुकिंग

नवी दिल्ली : 
झालेले नुकसान भरून काढण्यासाठी भारतीय रेल्वे (Indian Railways) अनेक प्रयत्न करीत आहे. यासाठी अनेक उपक्रमही राबवले जात आहेत. आताही महसूल वाढवण्याच्या उदेशाने रेल्वेने एक नवी योजना सादर केली आहे. गेले अनेक दिवस मागणी होत असल्याने आता उत्तर रेल्वे विभागाने सामानाची (Luggage) पिक अँड ड्रॉप सेवा सुरू केली आहे. ही सेवा ॲपवर आधारित असून, च्याच उपयोगाने वापरकर्ते आपले घर, हॉटेल किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून सामानाच्या वाहतुकीसाठी बुकिंग करू शकतात. हे समान प्रवाशाच्या कन्फर्म असलेल्या बर्थपर्यंत पोहोचवले जाईल.

याशिवाय रेलव स्टेशनवरून जर तुम्हाला कुठे सामान घेऊन जायचे असल्यास त्याचेही बुकिंग या अॅपवर करता येणार आहे.

सीपीआरओ दीपक कुमार म्हणाले, ‘BOW (Baggage On The Wheel) असे या ॲपचे नाव असून, ते अँड्रॉइड आणि आयफोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल. प्रवासी आपले सामान रेल्वे स्टेशनवर किंवा त्यांच्या घरी नेण्यासाठी या ॲपवर बुकिंग करू शकतात. हे सामान कंत्राटदाराकडून सुरक्षित पद्धतीने उचलले जाईल आणि प्रवाश्याच्या बुकिंगच्या पसंतीनुसार ते बर्थ अथवा त्याच्या घरी पोहोचवले जाईल. ही सेवा ज्येष्ठ नागरिक, शारीरिकदृष्ट्या अपंग आणि एकट्याने प्रवास करणाऱ्या यांच्यासाठी उपयुक्त ठरेल, असा दावा रेल्वेने केला आहे.

सर्वप्रथम ही सेवा नवी दिल्ली, दिल्ली जंक्शन, हजरत निजामुद्दीन, दिल्ली कॅन्ट, दिल्ली सराय रोहिल्ला, गाझियाबाद आणि गुडगाव रेल्वे स्थानकांमध्ये सुरु केली जाईल. मात्र सध्या तरी रेल्वेने बुक करण्यात येणाऱ्या सामानाचे वजन व त्याच्या शुल्काबाबत काही माहिती दिली नाही. परंतु यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाईल असा विश्वास आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा