You are currently viewing चोरीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या आरोपीने आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न

चोरीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या आरोपीने आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न

चोरीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या आरोपीने आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न

कणकवली

चोरीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचा संशयावरून एका संशयित व्यक्तीला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने चौकशीसाठी कणकवली पोलिस ठाण्यात बोलवल होत. संदीप प्रभाकर राऊत (३७, रा. कलमठ – बिडयेवाडी, मूळ निरोम – मालवण) असे त्या संशयत तरुणाचे नाव आहे. त्याने वाघेरी व फोंडाघाट येथील मंदिरांमध्ये घंटा चोरी केली असल्याची कबुली दिली. त्यानंतर संदीप राऊत यांने पोलिस स्थानकातील बाथरूम मध्ये जाऊन फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संदीप राऊत याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस रामचंद्र शेळके यांनी दिली आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.

संशयित संदीप राऊत याला ९ नोव्हेंबर रोजी करूळ येथील अंगणवाडीचे कुलूप फोडताना स्थानिकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यादरम्यान चौकशीत संदीप राऊत यांच्यावर मालवण पोलिस ठाण्यातही चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. त्यामुळे त्याचा कणकवली तालुक्यातील अन्य चोरीमध्ये सहभाग असल्याचा संशयावरून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी संदीप राऊत याला गुरुवारी त्याच्या कलमठ येथील राहत्या घरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्या चौकशीत संदीप राऊत याने वाघेरी श्री गांगो माऊली पावणादेवी मंदिरा मधील घंटा व फोंडाघाट येथील एका मंदिरातील घंटा चोरी केली असल्याची कबुली दिली. त्यानंतर संदीप राऊत पोलीस ठाण्यातील बाथरूम मध्ये गेला. तेथे त्याने फिनेल प्राशन करून बाहेर आला. त्यामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने पोलिसांनी त्याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. संदीप राऊत याने चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असल्याने पोलिस अटक करतील म्हणून फिनेल प्राशन केले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.

*संवाद मीडिया*

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा