You are currently viewing राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले विद्याभूषण पुरस्कार नांदेडचे गझलकार कवी जयराम धोंगडे यांना जाहीर!

राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले विद्याभूषण पुरस्कार नांदेडचे गझलकार कवी जयराम धोंगडे यांना जाहीर!

 

अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या सरकारमान्य ‘मराठी साहित्य मंडळाचा’ यावर्षीचा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय ‘सावित्रीबाई फुले विद्याभूषण पुरस्कार’ नांदेडचे प्रसिद्ध कवी गझलकार जयराम धोंगडे यांना जाहीर झाला आहे.

शब्दाटकी, कोरोनायण आणि जय बोले असे त्यांचे तीन गझल आणि काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांचा नवा गझलसंग्रह ‘तिपेडी’ लवकरच रसिकार्पण होत आहे. त्यांच्या पहिल्याच ‘शब्दाटकी’ या गझलसंग्रहास यापूर्वी मराठी साहित्य मंडळाने ‘राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्यभूषण पुरस्कार’ देऊन गौरविले होते. एकापाठोपाठ एक असे त्यांचे दर्जेदार संग्रह आणि एकूणच साहित्यिक वाटचाल लक्षात घेऊन त्यांना यावर्षीचा ‘विद्याभूषण’ पुरस्कार देण्याचे निवड समितीने एकमताने ठरविले आहे.

 

रविवार, दि.२९ जानेवारी २०२३ रोजी परभणी येथे संपन्न होणाऱ्या काव्यसम्मेलनात, मान्यवरांच्या उपस्थितीत होऊ घातलेल्या दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाणार आहे. या संदर्भात त्यांना मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष, जेष्ठ साहित्यीक डॉ. जयप्रकाश घुमटकर, उपाध्यक्षा ललिता गवांदे तथा सरचिटणीस नीलिमा जोशी यांच्या स्वाक्षरीचे पत्र प्राप्त झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा