You are currently viewing कॅटिलिव्हर फलक लावणारी मालवण पालिका ठरली जिल्ह्यातील पहिली नगरपालिका

कॅटिलिव्हर फलक लावणारी मालवण पालिका ठरली जिल्ह्यातील पहिली नगरपालिका

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उद्घाटन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य

मालवण

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीचे औचित्य साधून मालवण नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात उभारण्यात आलेल्या दिशादर्शक फलकाचे उदघाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शहराचे प्रवेशद्वार असलेल्या मालवण देऊळवाडा येथे करण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात नगर पालिका क्षेत्रातील कँटीलिव्हर (कमान स्वरूपात) फलक बसवणारी मालवण नगरपालिका ही जिल्ह्यातील पहिली पालिका ठरली आहे. आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातुन तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा वार्षिक योजना २०१९-२० पर्यटन स्थळ विकास व मूलभूत सोयीसुविधा या योजनेतून दिशादर्शक फलकासाठी २४ लाख ४० हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी यावेळी दिली. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यासह आरोग्य व पर्यटन सभापती दर्शना कासवकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे, महिला बालकल्याण सभापती शिला गिरकर, नगरसेविका पूजा करलकर, आकांक्षा शिरपूटे, दीपक पाटकर, नितीन वाळके,पूनम चव्हाण, दीपा शिंदे, भाई कासवकर, यशवंत गावकर, प्रमोद करलकर, उमेश मांजरेकर, राजू परब, प्रसाद आडवणकर, दशरथ कवटकर यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी शहरात बसवण्यात आलेल्या फलकांपैकी दिशादर्शक वाहतूक नियंत्रण फलक १२, गतिरोधक व शाळा दर्शक १६, माहिती दर्शक ४० कॅटीलिव्हर फलक २ असे एकूण ७० दिशादर्शक फलक शहरात लावण्यात आले आहेत. निधीच्या उपलब्धतेनंतर राहिलेल्या ठिकाणी फलक बसवले जातील असे सांगितले फोटो : मालवण शहरात दिशादर्शक फलकाचे उदघाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + 5 =