You are currently viewing लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाचे काम वाखाणण्याजोगे – आमदार नितेश राणे

लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाचे काम वाखाणण्याजोगे – आमदार नितेश राणे

कै. प्रमोद परब स्मृती चषकाचा आराध्या स्पोर्ट्स मळगाव संघ मानकरी तर डी एम स्पोर्ट्स मालवण उपविजेता

कणकवली

लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाचे काम वाखाणण्याजोगे आहे. आपल्या मित्राच्या आठवणी जपत क्रिकेट स्पर्धेसोबत सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम हे मंडळ राबवत आहे. हळवल गावच्या विकासाच्या दृष्टीने आपला आमदार म्हणून सैदव आपल्या सोबत आहे. असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले.
लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी आयोजित कै. प्रमोद परब स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेला आमदार नितेश राणे यांनी भेट दिली यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, हळवल सरपंच अपर्णा चव्हाण, उपसरपंच सान्वी गावडे, वागदे सरपंच संदीप सावंत, डॉ दिलीप घाडी, संतोष गुरव, शशिकांत राणे, प्रदीप गावडे, नरेश साटम, प्रकाश पवार, संतोष साटम, जगदीश राणे, वामन परब, सुदर्शन राणे, मंडळाचे अध्यक्ष लवू परब, उपाध्यक्ष भरत गावडे, खजिनदार राकेश गावडे, सचिव दीपेश परब, सहखजिनदार अक्षय परब, अरुण राऊळ, किरण राऊळ, दशरथ परब, मंगेश गावडे, दिपक राऊळ, विकास गावडे, सतीश गावडे, प्रशांत गावडे, गिरीश परब, हर्षल परब, अनिकेत परब, महेश परब शैलेश परब, सिद्धेश परब, रोहित परब, अजय परब, संदेश गावडे, सागर गावडे आदींसह मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते लवु परब यांना समाज मित्र पुरस्कराने गौरविण्यात आले. कै. प्रमोद परब स्मृती चषकावर आराध्या स्पोर्ट्स मळगाव या संघाने नाव कोरले तर डी एम स्पोर्ट्स मालवण संघ उपविजेता राहिला. उपांत्यफेरीत विनसम वागदे व स्टार बॉईज हळवल हे संघ पराभूत झाले. मालिकावीर म्हणून रंजन केणी, गोलंदाज म्हणून शेखर राऊळ, सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून तेजस सावळ ( सर्व आराध्या स्पोर्ट्स मळगाव) फलंदाज म्हणून सचिन आचरेकर, क्षेत्ररक्षक म्हणून ओंकार, ( दोन्ही डी एम मालवण ) तर यष्टीरक्षक म्हणून सतीश गावडे, उदयोन्मुख खेळाडू म्हणून अनिकेत परब ( दोन्ही स्टार बॉईज ) यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. विजेत्या संघास रोख रक्कम 25 हजार 25 व पाच फूट आकर्षक चषक व उपविजेत्या संघास रोख रक्कम 15 हजार 15 व साडेचार फूट आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + 10 =