You are currently viewing पंतप्रधान ग्रामसडक मुख्यमंत्री ग्रामसडक योजनाच्या रस्त्याच्या कामांमध्ये घोटाळा

पंतप्रधान ग्रामसडक मुख्यमंत्री ग्रामसडक योजनाच्या रस्त्याच्या कामांमध्ये घोटाळा

दोडामार्ग पं.स. सदस्य लक्ष्मण नाईक व भाजप पदाधिकाऱ्याचे उपोषण सूरूच

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यात पूर्ण झालेल्या तसेच सुरू असलेल्या पंतप्रधान ग्रामसडक मुख्यमंत्री ग्रामसडक योजनाच्या रस्त्याच्या कामांत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. एकही काम नियमानुसार नाही किंवा त्याचा जनतेला फायदा नाही. केवळ ठेकेदाराना व अधिकाऱ्यांना हे रस्ते म्हणजे कुरण बनले आहेत, संबंधित कामांची चौकशी व्हावी,यासाठी दोडामार्ग पंचायत समिती सदस्य लक्ष्मण नाईक तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दोडामार्ग तहसीलदार कार्यालय येथे बेमुदत उपोषणाला सुरुवात केली असून आज दुसऱ्या दिवशी ही उपोषण सुरू आहे. उपोषणस्थळी आलेले अधिकारी योग्य ते उत्तर देण्यास निरुत्तर ठरत असून संबंधित ठेकेदार यांना घेऊनच झालेल्या कामाची चौकशी व्हावी त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात येईल असा पवित्रा बाळा नाईक व भाजपा कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा