You are currently viewing स्त्री पुरुष या दोघांनीही परस्परांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे –  गीताली वि. म.

स्त्री पुरुष या दोघांनीही परस्परांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे –  गीताली वि. म.

*स्त्री पुरुष या दोघांनीही परस्परांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे* –  गीताली वि. म.

कणकवली

मिळून साऱ्याजणी मासिक पुणे शाखा सिंधुदुर्ग आणि नवदुर्गा वस्ती स्तर संघ कणकवली यांच्या संयुक्तपणे सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या महिला मेळाव्यात महिलांची संवाद साधताना मिळून साऱ्याजणी मासिकाच्या संपादिका गीताली वि. म. यांनी आपले विचार मांडले . प्रत्येकानी ती स्त्री तो पुरुष भेदभाव न करता प्रथम आपण माणूस आहोत ही भावना झोपली पाहिजे.
घराघरात लिंगभाव पाळला जातो म्हणजे स्त्रियांच्यात सौभाग्यवती परितक्ता विधवा कुमारी असे भेदभाव केले जातात पुरुषांमध्ये अशी कोणतीही उतरंड नसते . आपल्याला लिंगभेद ,हिमसामुक्त समाज घडवायचा असेल तर ती,तो आणि ते परस्परांना सोबत घेऊन माणूसपणाच्या वाटेवर चालावे लागेल असे मत गीताली वि म यांनी व्यक्त केले. यावेळी
मिळून साऱ्याजणी जानेवारी२०२३च्या अंकाचे प्रकाशन सहाय्यक प्रकल्प संचालक अमोल भोगले यांच्या हस्ते करण्यात आले.
याशिवाय “*बचत गटांनी मला काय” दिले*” या विषयावर वक्तृत्व स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम गितांजली शिरोडकर द्वितीय
सिद्धी उम्ररजकर
तृतीय पुर्वा सुतार क्रमांकाच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमात मिळून साऱ्याजणी मासिकाच्या सिंधुदुर्ग प्रतिनिधी अर्पिता मुंबरकर , विशाखा येरम, श्रद्धा कदम, तसेच नवदुर्गा वस्ती स्तर संघाच्या अध्यक्ष प्रिया सरूडकर उपाध्यक्ष सुवासिनी टकले सचिव पूर्वा सुतार खजिनदार आस्मा बागवान आरोग्य सल्लागार शुभांगी उबाळे शुभरत्ना राणे सायली लाड श्वेता नार्वेकर प्रीती वाळके तसेचALF सर्व सदस्य यांच्या सहभागाने कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. या कार्यक्रमात स्पर्धेचे परीक्षण विद्या घाणेकर वैशाली कोरगावकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा सावंत तर प्रास्ताविक सृष्टी शिर्के आभार डॉक्टर शमिता बिरमोळेज्ञ यांनी व्यक्त केले कार्यक्रमाची सांगता श्रद्धा कदम यांच्या मिळून साऱ्याजणी 2023 च्याह जानेवारीच्या अंकातील सावित्रीबाईला तिच्या लेकीने लिहिलेलं पत्र या लेखाच्या अभिवाचनाने करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × two =